हिंबा जमातीच्या महिला आयुष्यात एकदाच करतात अंघोळ…

या जमातीत महिलांना पाण्याने आंघोळ करण्यास सक्त मनाई आहे.
हिंबा जमाती
हिंबा जमातीsakal
Updated on

आताच्या बदलत्या काळानुसार 'सौंदर्य' या शब्दाची व्याख्याही रोज बदलताना दिसत आहे. बॉलीवूडच्या अमुक अमुक अभिनेत्रीने लाखो रुपये खर्च करुन प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे रोजच आपल्या बातम्यांमध्ये पाहायला मिळते पण मात्र खरं "सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते". हे आफ्रिकेतील वायव्य नामिबियातील कुनैन प्रांतातील "हिंबा" जमातीच्या महिलांनी सिद्ध केले.

वास्तविक या जमातीच्या महिला आयुष्यात एकदाच अंघोळ करतात. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना? त्यामुळे जराही वेळ न लावता, या लेखातून आम्ही तुम्हाला या जमातीविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.

हिंबा जमाती
टेक्नोहंट : सोशल मीडिया सरकारच्या नियंत्रणात?

सुरुवातीला पाहू या जमातीविषयी काही मनोरंजक गोष्टी

या जमातीत सुमारे 50,000 हजार लोकसंख्या आहे. ही जमात उत्तर-पश्चिम नामिबियातील कुनैन प्रांतात राहते. असे म्हणतात की प्रत्येक जमातीचा इतिहास, संस्कृती आणि सभ्यता वेगळी असते. पण या जमातीतील महिलांची जीवनशैली अतिशय अनोखी आणि मनोरंजक आहे.

हिंबा जमाती
मृत पतीचा आवाज ऐकण्यासाठी 'ती' रोज रेल्वे स्टेशनवर जाते; काय आहे गूढ?

इथे पाण्याने आंघोळ करण्यास सक्त मनाई आहे

या जमातीत महिलांना पाण्याने आंघोळ करण्यास सक्त मनाई आहे. हिंबा जमातीतील प्रत्येक महिला ही आयुष्यात एकदाच अंघोळ करते. तो दिवस असतो तिच्या लग्नाच्या. त्याच दिवशी तिच्यावरील अंघोळीची बंधने एका दिवसाकरता मोकळी केली जातात.

स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही आणि मी दिवसातून रोज एकदा आंघोळ करतो.कधी कधी दोनदा देखील आंघोळ होते पण मात्र या जमातीतील महिला स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी नैसर्गिक वनौषधींचा वापर करतात.

हिंबा जमाती
जिजाऊंच्या आयुष्यात अंधश्रद्धेला बिलकुल थारा नव्हता...

स्वत:ला स्वच्छ ठेवण्याचे या महिलांचे खास तंत्र आहे.

या जमातीतील महिला सर्वप्रथम पाणी घेतात. मग त्या पाण्यात ती विशिष्ट प्रकारची औषधी वनस्पती उकळतात. त्यानंतर त्या उकळत्या पाण्यातून जो धुर निघतो. त्या धुराने महिला आपल शरीर स्वच्छ करतात.या धुरामुळेच त्याच्या शरीरातून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही हे खूपच आश्चर्यचकीत करणार आहे. कारण आपण एक दिवस आंघोळ नाही केली तर अंगाचा वास यायला लागतो. या महिला बिना अंघोळीच्या कशा राहत असतील हा प्रश्न मनाला पडतोच.

विशेष लोशन

याशिवाय या जमातीच्या महिला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शरीरावर एक विशेष प्रकारचे लोशन लावतात. त्यांचे लोशन प्राण्यांची चरबी आणि हेमॅटाइट (लोहाचे खनिज स्वरूप) यांच्यापासून तयार केले जाते. या लोशनमुळे त्यांची त्वचा लाल दिसू लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.