महिलांनो अंतर्वस्त्रे खरेदी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...

अंतर्वस्त्रे खरेदी करण्यापूर्वी महिलांना माहिती असायला पाहिजे या महत्त्वाच्या गोष्टी
महिलांनो अंतर्वस्त्रे खरेदी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...
Updated on

Tips For Underwear: जर तुम्हाला वाटत असेल की अंतर्वस्त्र खरेदी करणे म्हणजे त्याचा रंग आणि स्टाईलवर लक्ष देणे तर तुम्ही खूप चूकीचा विचार करत आहात. अंतर्वस्त्र खरेदी करताना आणखी बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात ज्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवे. विशेषत: महिलांना आपले अंतर्वस्त्र खरेदी करताना आपल्या योनीबाबत (Vagina)व्यवस्थित विचार करायला हवा. बहूतेक महिला असे अंतर्वस्त्र खरेदी करतात जे दिसायला आकर्षक असतात, पण असे करणे योग्य नाही. त्याचा रंग, कट आणि स्टाईल पारखण्याशिवाया हा देखील विचार करायाला हवा की तुमच्या योनीसाठी ते अंतर्वस्त्र चांगले आहे का?

अतंर्वस्त्रमध्ये काही असे मटेरिअल्स (Materials) असतात जे तुम्ही खूप काळ वापरले तर त्यामुळे योनीच्या आसपास खाज येऊ शकते, आग होऊ शकते किंवा एखादा गंभीर आजार होऊ शकतो. तुम्हाला यीस्ट किंवा योनीमध्येही संक्रमण होऊ शकते. तुम्हाला योग्य आतंर्वस्त्र कसे निवडाल? याच्या काही खास टीप्स जाणून घ्या

महिलांनो अंतर्वस्त्रे खरेदी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...
रोज दारू पिणाऱ्याने महिनाभर सोडली तर शरीरावर काय परिणाम होतो?

योनीसाठी योग्य अंतर्वस्त्र खरेदी करण्याच्या टिप्स, tips to buy Vagina friendly underwear

- तुम्हाला असे अंतरवस्त्र खरेदी करायला हवे जे तुमच्यासाठी आरामदायी आहे. प्रत्येक महिलेचे शरीर वेगळे असते त्यामुळे कोणाला हिपस्टर्स सर्वात चांगले असते कोणालाठी बिकनी कट. तुम्ही काहीही खरेदी केले तरी याची खात्री करा की तुम्हाला आरामदायी वाटेल.

- त्याशिवाय अंतर्वस्त्राची साईजकडेही लक्ष द्या. तुम्हाला छोट्या साईजमध्ये फिट व्हायचं असते पण तुम्हाला आरामदायी वाटत नसेल तर अस करू नका. छोटे साईज अंतर्वस्त्रामुळे योनीमध्ये आग होऊ शकते. तसेच इंफेक्शनचा धोका आणि रॅशेस देखील होऊ शकतात.

-लेसवाल्या अंतर्वस्त्रामध्ये महिलांना आकर्षक असल्याचा अनुभव येतो. तुम्ही कधी कधी असे अंर्तवस्त्र वापरू शकता पण तुम्ही ते नियमित वापर असला तर तुम्हाला अवघडल्यासारखे होईल आणि खाज देखील सुटू शकते. तसेच स्किनवर लाल डाग होऊ शकतात.

- थोंग्सच्या बाबतीतही असे होते. जर तुम्ही असे कापड वापर असाल जे खूप घट्ट आहे किंवा सिंथेटेक कपडेपासून तयार केले असेल तर आग होऊ शकते.

महिलांनो अंतर्वस्त्रे खरेदी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...
तिशीच्या आत लग्न कराल तर फायद्यात राहाल, वाचा ५ फायदे

तुमच्या योनीसाठी सर्वात चांगले अंतर्वस्त्रे कोणते?

प्युअर कॉटनपासून बनविलेले अंतर्वस्त्र सर्वात चांगले असते. काही लोक नायलॉन, पॉलिस्टर किंवा स्पैन्डेक्स पासून बनविलेले अंतर्वस्त्र वापरतात. हे सिंथेटक कपडामुळे गरम होते आणि ओलावा निर्माण होतो. तेच कॉटनमध्ये असा कोणताही त्रास होत नाही. तुम्हाला आरामदायी देखील वाटते आणि तुमच्या योनीला देखील निरोगी राखते.

तुमच्या योनीसाठी काय आहे वाईट?

सर्वात आधी लहान साईजचे अंतर्वस्त्रे खरेदी करू नका. त्यामुळ त्वचेची आग होते आणि खाज सुटते. काही संशोधन सांगतात की, खराब फिटिंगचे अंतर्वस्त्र देखील इनग्रोन हेयर निर्माण करू शकतात. असे अंतर्वस्त्रांपासून दूर राहायला पाहिजे जे वापरण्यासाठी घाम येतो. वर्कआऊट नंतर घामामुळे नेहमी आपले अंतरवस्त्र बदला. ओलाव्यामुळे यीस्ट आणि बॅक्टेरीअरल संक्रमण होऊ शकते. थोंग्जपासून देखील वाचले पाहिजे कारण ते इतर अंतर्वस्त्रांच्या तुलतेन कमी स्वत्छ असतात. त्याच्या अनोख्या रचनेमुळे काही जीवाणू त्यावर पटकन चिकटून राहतात आणि ते अजिबात आरोग्यदायी नसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.