Bangles Wearing Tips: बांगड्या घालायला त्रास होतोय? मग या पद्धतींचा अवलंब करा

महिला बांगड्या निवडताना खूप विचार करतात.
how to wear tight bangles
how to wear tight banglessakal
Updated on

How to wear tight bangles: महिला बांगड्या निवडताना खूप विचार करतात. काही वेळा काही महिलांच्या हातात बांगड्याही टाईट होतात. अशा परिस्थितीत त्यांना कॅरी करणे फार कठीण होऊन बसते.

त्यामुळे अनेक वेळा मनगटात बांगड्या तुटतात त्यामुळे दुखापत होण्याचा धोकाही कायम असतो. अशा परिस्थितीत काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही काही मिनिटांत घट्ट बांगड्या सहज कॅरी करू शकता.

मॉइश्चरायझर किंवा तेलाची मदत घ्या: कधीकधी वजन वाढल्यामुळे किंवा हात ताठ झाल्यामुळे बांगड्या घालणे खूप कठीण होते. अशावेळी बांगड्या घालण्यापूर्वी हातावर मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावू शकता. यामुळे बांगड्या सहज हातात बसतील.

how to wear tight bangles
General Knowledge : पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या जीन्स पँटचा खिसा छोटा का असतो? कारण वाचून व्हाल थक्क

साबण वापरा: जर बांगड्या घट्ट असतील तर तुम्ही साबण देखील वापरू शकता. अशावेळी बांगडी घालण्यापूर्वी हाताला साबण व्यवस्थित लावा. यानंतर, तुम्ही बांगड्या घालताच, साबणाच्या गुळगुळीतपणामुळे, त्या लगेच हातात बसतील. यानंतर, स्वच्छ पाण्याने आपले हात धुण्यास विसरू नका.

एलोवेरा जेलची मदत घ्या: बांगड्या सहज घालण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेलचीही मदत घेऊ शकता. यासाठी सर्वप्रथम हातावर जेल चांगले लावा. यानंतर बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने तुम्ही काही सेकंदात बांगड्या सहज कॅरी करू शकाल.

how to wear tight bangles
Dry Dates for Skin Care: त्वचेसाठी खजूरही चमत्कारिक, अशा प्रकारे करा वापर

हातमोजे घाला: कधी कधी बांगडी खूप घट्ट होते आणि अंगठ्याच्या हाडात अडकते. अशा परिस्थितीत तुम्ही हातमोजे घालून बांगडी कॅरी करू शकता. त्यासाठी आधी हातमोजे घाला, नंतर हातात बांगड्या फिरवत गोल गोल फिरवा. अशाप्रकारे बांगडी अंगठ्याचे हाड ओलांडून मनगटापर्यंत सहज पोहोचते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.