Women's Day 2024 : महिला या समाजाचा एक महत्वाचा घटक आहेत. महिलांशिवाय हे जग अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. समाजाच्या नव्हे तर देशाच्या विकासामध्ये आणि जडणघडणमध्ये महिलांचा मोलाचा वाटा आहे.
मात्र, आज ही देशात आणि जगात अनेक महिला आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये महिलांना त्यांच्या हक्कांची आणि अधिकारांची जाणीव व्हावी, या उद्देशाने जगभरात दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
जगभरातील अनेक देशांमध्ये दीर्घकाळापासून महिल सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. या परिस्थितीमध्ये महिलांसाठी सुरक्षित आणि प्रगतीशील वातावरण निर्माण करण्यासाठी आपले सरकार प्रत्येक क्षेत्रात अनेक प्रयत्न करत आहे. आता रेल्वेचे उदाहरण घ्या. रेल्वने महिलांना त्यांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित व्हावा यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे खूप कमी महिलांना याबद्दल माहित आहे. त्यामुळे, उद्याच्या महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला रेल्वेकडून महिलांना दिल्या जाणाऱ्या काही खास सुविधांबद्दल सांगणार आहोत. कोणत्या आहेत या सुविधा? चला तर मग जाणून घेऊयात.
देशातील एक्सप्रेस रेल्वेमध्ये अनारक्षित क्षेणीतील महिलांसाठी स्वतंत्र डबा राखीव आहे. या व्यतिरिक्त १५० किमी पर्यंतचे कमी अंतर पार करणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये महिलांसाठी वेगळे डबे किंवा कोच हे राखीव असतात.
इतकेच नव्हे तर जिथे आवश्यक आणि शक्य असेल तिथे भारतीय रेल्वेकडून महिलांसाठी खास विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जातात. यासंदर्भातील अधिक माहिती तुम्ही रेल्वे कार्यालयाकडून घेऊ शकता.
जर तुम्ही गरोदर असाल आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला मधला किंवा वरचा बर्थ देण्यात आला असेल तर, तुम्ही बर्थ एक्सचेंज करू शकता. ट्रेन सुटल्यानंतर खालचा बर्थ रिकामा असल्यास गर्भवती महिला ऑनबोर्ड तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. तसेच, त्यांना मधल्या किंवा वरच्या बर्थऐवजी लोअर बर्थ देण्याची मागणी करू शकतात. रेल्वेतील बर्थ एकसचेंज करण्याचा महिलांना अधिकार आहे.
काही कारणांमुळे जर एखाद्या महिलेला रात्री उशिरा ट्रेनमध्ये प्रवास करावा लागला आणि त्यावेळी तिच्याकडे तिकीट नसेल तर रेल्वेतील टीटीई तुम्हाला ट्रेनमधून खाली उतरवू शकत नाही.
जर तुम्हाला जबरदस्तीने टीटीईने ट्रेनमधून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला तर, तुम्ही महिला रेल्वे प्राधिकरणाकडे रीतसर तक्रार करू शकता. खरं तर विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करणे बेकायदेशीर आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला ट्रेनमधून जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले तर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी आरपीएफ किंवा जीआरपीची असेल.
रेल्वेच्या संगणीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली अंतर्गत तरतूद करण्यात आल्याप्रमाणे ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना लोअर बर्थ दिला जाईल. जर तिकीट आरक्षणादरम्यान, सीटचा पर्याय दिला नसेल तरी देखील ही तरतूद लागू असेल. त्यामुळे, महिलांना ही तरतूद आणि हा लोअर बर्थचा पर्याय माहित असणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.