तरूणी आणि महिलांमध्ये स्लीवलेस ड्रेसची फॅशन आहे. स्टायलिश दिसण्यासाठी, टूरवर गेल्यावर आरामदायक वाटावं यासाठी हा ट्रेड मार्केटमध्ये आला आहे. पण, अनेकींसमोर हा मोठा प्रश्न असतो की, स्लीवलेस ड्रेसवर ब्रा कशी घालायची. कारण, ब्राची पट्टी अधून-मधून बाहेर येत असते. त्यामुळे चार चौघार अवघडल्यासारखं वाटतं.
महिलांना स्टायलिश कपडे घालायला आवडतात. परंतु बऱ्याच वेळा, त्यांना योग्य फिटिंग इनरवेअर विशेषतः त्यांच्या ड्रेससह ब्रा निवडण्यात अडचणी येतात. कारण काही फॅन्सी आउटफिट्सवर ब्रा घालणे अवघड बनते.
कधीकधी बॅकलेस ड्रेसवर ब्राचा हुक-स्ट्रॅप दिसून येतो. असे फोटो काढल्यास ते आयुष्यभर आपल्याला गिल्टी फिल करवू शकते. त्यामुळे महिलांना फॅशनेबल कपडे कसे घालावेत तसेच ब्रा योग्य प्रकारे कशी घालायची हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण ब्राशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सोप्प्या पद्धतीने ब्रा घालू शकता आणि जी सतत बाहेर डोकावणार नाही. (Womens Fashion Tips)
ब्रा क्लीप वापरा
जर तुम्ही फॅन्सी ड्रेससोबत नॉर्मल ब्रा घातली असेल आणि तिचे पट्टे बाजूला दिसत असतील तर तुम्ही दोन्ही पट्ट्या मधोमध एकत्र करू शकता. तुम्ही यासाठी सेफ्टी पिन देखील वापरू शकता, परंतु पीन वापरणे अवघडल्यासारखे दिसू शकते. यासाठी तुम्हाला बाजारात ब्रा क्लिप मिळतील. ज्याच्या मदतीने ब्राचे पट्टे तुमच्या पाठीमागे फिट बसतील.
स्ट्रॅप होल्डर्स
सर्व प्रकारच्या फॅशनेबल कपड्यांमध्ये दोन्ही खांद्याजवळ लहान स्ट्रॅप होल्डर स्ट्रिप्स असतात. ज्यामध्ये तुम्ही ब्राचा पट्टा ठेवू शकता आणि हुक लावू शकता. यामुळे, तुमच्या ब्राचे पट्टे हातातून किंवा खांद्यावरून बाहेर येणार नाहीत आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा पट्ट्या वाढवण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
न्यूड ब्रा
तुम्हाला हवा तसा ड्रेस घालायचा असेल तर या ब्रा तुमची खूप मदत करतील. कारण ब्रा तुम्ही घातली आहे की नाही हेच कोणाला कळणार नाही. अशा या ब्रा आहेत. कारण या ब्रा, किंवा पारदर्शक पट्टी असलेली ब्रा तुमच्या शरीरातील रंगाप्रमाणे वाटते. ज्यामुळे त्याची पट्टी दिसत नाही.
तुम्ही डिप नेक ड्रेस घालणार असाल तर त्यावर ही ब्रा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कारण, यामुळे तुम्ही ब्रा घातलीच नाही असे भासेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.