Womens Fashion : अनारकली ड्रेस फिट नसेल तर झबलं घातल्यासारखंच वाटतं, या टिप्स वापरा अन् मिळवा परफेक्ट लुक

मशिनशिवाय ड्रेस फिट करेल ड्रेसची नॉट
Womens Fashion : अनारकली ड्रेस फिट नसेल तर झबलं घातल्यासारखंच वाटतं, या टिप्स वापरा अन् मिळवा परफेक्ट लुक
Updated on

Womens Fashion :

महिलांचे फॅशन ट्रेंड कितीही बदलले तरी बदलत्या जमान्यात अनारकली ड्रेसचा हात कोणीही धरू शकत नाही. अनारकली ड्रेस पूर्वीच्या चित्रपटातही होते आणि आत्ताही ती फॅशन आवडीने केली जाते.

फक्त नेक बॉर्डर डिझाईन, कंबरेपर्यंतची डिझाईन आणि संपूर्ण अनारकली प्लेन, नेट, शिफॉन, कॉटन अशा अनेक व्हरायटीमध्ये अनारकली उपलब्ध आहेत. यात कमी घेर आणि अनेक पाकळ्या असलेला घेर असाही प्रकार आहे. पण हे ड्रेस कॅरी करणं तेव्हाच आरामदायक असतं. जेव्हा ते आपल्याला परफेक्ट बसतात.

Womens Fashion : अनारकली ड्रेस फिट नसेल तर झबलं घातल्यासारखंच वाटतं, या टिप्स वापरा अन् मिळवा परफेक्ट लुक
Women Fashion Tips: एकच स्टाइल करून कंटाळा आलाय? ट्रॅडिशनल वेअरला असा द्या फ्युजन टच!

चेस्ट आणि पोटात लूज असलेले ड्रेस, शोल्डरमध्ये लूज असलेला अनारकली आरामदायक वाटत नाही. परफेक्ट लुक आणि परफेक्ट फिटींग नसलेला अनारकली आपल्याला झबला घातल्यासारखे दिसू शकते. त्यामुळे अनारकली वेअर केलीत तर या गोष्टीं नक्की चेक करा.

फॅब्रिक कोणत आहे?

सूटच्या चांगल्या फिटिंगसाठी, आपण योग्य फॅब्रिक निवडणे महत्वाचे आहे. कारण केवळ यामुळे सूट अधिक चांगला दिसेल. तसेच, जेव्हा तुम्ही धुवून परिधान कराल तेव्हा ते लहान होणार नाही किंवा त्याचा रंग फिका होणार नाही. यामुळे तुम्ही त्यात कितीही घेर टाकू शकता. ज्यामुळे त्याला हेवी लुक येईल.

Womens Fashion : अनारकली ड्रेस फिट नसेल तर झबलं घातल्यासारखंच वाटतं, या टिप्स वापरा अन् मिळवा परफेक्ट लुक
Women Fashion : एथनिक ड्रेससोबतही मॅच होतील चोकर्स; पाहा लेटेस्ट डिझाईन्स

नॉट बांधा

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सूटचे फिटिंग चांगले नाही, तर तुम्ही ड्रेसच्या मागे नॉट जोडू शकता. यामुळे फिटिंग अधिक चांगले होईल आणि सूटमध्ये नवीन डिझाइन तयार होईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही या नॉटमध्ये वेगळ्या प्रकारचे लटकन देखील जोडू शकता जेणेकरून ते जड दिसेल.

कटची काळजी घ्या

अनारकली सूटचा कट तुमच्या शरीरानुसार असावा. तुम्ही सडपातळ असल्यास, तुम्ही ए-लाइन किंवा फिट-अँड-फ्लेअर कट निवडू शकता. जर तुम्ही थोडे मोकळे असाल तर तुम्ही एम्पायर कमर किंवा ए-लाइन कट निवडू शकता. यामुळे तुमचा सूटही चांगला बसेल आणि तुम्ही सुंदर दिसाल.

Womens Fashion : अनारकली ड्रेस फिट नसेल तर झबलं घातल्यासारखंच वाटतं, या टिप्स वापरा अन् मिळवा परफेक्ट लुक
Anarkali Suit Fashion : लग्नापासून ते कॅज्यूअल वेअरपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट असा एकमेव सूट

दुपट्टा घ्या

अनेकदा मुलींना सूटसोबत दुपट्टा घालायला आवडते. जर तुम्हालाही असा दुपट्टा स्टाईल करायला आवडत असेल तो नक्की वेअऱ करा. याने अनारकली सूटला नवा लुक येईल.तसेच, यामुळे तुम्ही स्लिम दिसाल. यासाठी तुम्ही दुपट्टा उघडून पिन करू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास दुपट्टा एका खांद्यावर पिन करू शकता जेणेकरून तुमचा लूक चांगला दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.