Women’s Health : शारीरिक संबंधानंतर लगेचच लघवी केली तर प्रेग्नंसी टाळता येते का?

Womens Health Fact : ज्या महिलांना लगेचच मूल नको असते, त्यांना हा सल्ला अनेक मैत्रिणींकडून दिला जातो. पण हे खरं आहे का?
Women’s Health
Women’s Health esakal
Updated on

Women’s Health :

दररोजच्या जीवनात महिलांना अनेक समस्यांनी ग्रासलेले असते. या समस्या सोडवण्यासाठी त्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते. पण, महिला वेळ काढून स्वत:साठी काहीही करत नाहीत. तर स्वत:च्या प्रकृतीसाठी काहीही पुढाकार घेत नाहीत.

महिलांसाठी त्यांच्या लैंगिक आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. लैंगिक आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्या समजून घेणे खूप महत्वाचे आहे. याउलट, बहुतेक स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात किंवा याबद्दल बोलण्यास कचरतात. (Women's Health)

Women’s Health
Women’s Health : शारीरिक संबंधानंतर महिलांनी अशी करावी प्रायव्हेट पार्टची स्वच्छता, अनेक आजार टाळता येतील

लैंगिक आरोग्य आणि आनंद समजून घेण्यासाठी, आपल्या जोडीदाराशी याबद्दल बोलणे महत्वाचे आहे. शारीरिक संबंधाबाबतही महिलांच्या अनेक शंका असतात. पण, त्यावर उघडपणे चर्चा केल्या जात नाहीत. हेच कारण आहे की स्त्रिया स्वतःच त्यांचे लैंगिक आरोग्य समजत नाहीत. म्हणूनच त्या संबंधित काही अफवांवर विश्वास ठेवतात.

लैंगिक संबंधांनंतर गर्भधारणेची शक्यता कशी वाढते किंवा या काळात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे नीट समजून घेण्याची गरज आहे. बऱ्याच स्त्रियांचा असा विश्वास आहे की, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लघवी केल्याने गर्भधारणेची शक्यता कमी होते? हा तर्क असा लढवला जातो की, लगेचच लघवी केल्याने शुक्राणू बाहेर टाकले जातात.

Women’s Health
Women’s Health : पाळीनंतर Vagina मध्ये सुटते खाज, प्रत्येकीलाच वाटते याची लाज, तर हे घरगुती उपाय करायलाच हवेत

अनेक महिलांचा असा समज आहे की हे खरे आहे. त्यामुळे,ज्या महिलांना लगेचच मूल नको असते, त्यांना हा सल्ला अनेक मैत्रिणींकडून दिला जातो. पण हे खरं आहे का?

स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूती तज्ञ अदिती बेदी यांच्या मते, लैंगिक संबंधानंतर लघवी करणे आवश्यक आहे. परंतु, तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे. की लैंगिक संबंधानंतर, लघवी केल्याने यूटीआयचा धोका दूर होतो. ज्या महिलांना यूटीआयची म्हणजे तुमचे मूत्राशयाच्या संसर्गाची समस्या आहे त्यांनी नक्कीच लघवी करणे आवश्यक आहे. (Relationship Tips)

Women’s Health
Live In Relationship: 'लिव्ह-इन'मध्ये राहणारं जोडपं झालं वेगळं, लग्न झालं नसलं तरी महिलेला मिळणार 'पोटगी'; हायकोर्टाचा निर्णय

अशा स्थितीत लघवी केल्याने यूटीआयची शक्यता कमी होते. तथापि, ही एक अचूक पद्धत नाही. तज्ज्ञ म्हणतात की लैंगिक संबंधाच्या अर्ध्या तासाच्या आत लघवी करणे आवश्यक आहे, परंतु यामुळे गर्भधारणा टाळता येत नाही.

मूत्रमार्ग आणि योनी पूर्णपणे भिन्न आहेत. लैंगिक संभोगाच्या वेळी, पुरुषाचे शुक्राणू योनीमध्ये प्रवेश करतात आणि तुम्ही लघवी करत असाल की नाही, याचा तुमच्या गर्भधारणेच्या शक्यतांवर परिणाम होणार नाही.  

Women’s Health
Relationship Tips: रोज रात्री ११ नंतरच ‘तो’ मेसेज करतोय? मुलींनो हे पाच Red Flags लक्षात ठेवा

तर तुम्ही लैंगिक संभोगानंतर लघवी करणे आवश्यक आहे. UTI ची शक्यता नक्कीच कमी करू शकते. पण, गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे कंडोम किंवा इतर पर्यायांचा वापर करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.