कोविडपासून सुरु झालेली वर्क फ्रॉम होमची पद्धत त्यानंतरही अनेक कंपन्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पुढे चालूच ठेवली आहे. यामुळे संस्थांना इंफ्रास्ट्रक्चरवर कमी खर्च करावा लागतो तर कर्मचाऱ्यांना देखील ते सोयिस्कर वाटू लागले आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उत्पादकता कार्यालायात काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांपेक्षा १८ टक्क्यांनी कमी आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या नवीन संशोधनातून हे समोर आले आहे.
दैनिक दिव्य मराठीने याविषयीचे वृत्त दिले होते. कोरोना काळात काम पुर्णपणे बंद करण्यापेक्षा आपापल्या घरून काम करण्याचा पर्याय कंपन्यांनी दिला. त्याकाळात शिवाय त्यानंतरही हा पर्याय फायदेशीर असल्याचे त्यांना वाटत होते. पण या नव्या संशोधनामुळे या समजूतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिवाय यातून अजून बरेच धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
जॉब साइट इंडिडच्या अहवालानुसार रिमोट वर्क नोकऱ्यांच्या शोधात ३७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरातून काम करण्याविषयी लोकांमध्ये लोकप्रियता वाढत आहे. या अहवालानुसार जॉब पोर्टलवर नोकरी शोधणारे रिमोट वर्क करण्यासाठी अधिक इच्छुक असतात. त्यामुळेच नोकरीच्या शोधात रिमोट वर्क, वर्क फ्रॉम होम आणि इतर तत्सम शब्दांचा कल वेगाने वाढला आहे. शिवाय अशा प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये १६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
८३ टक्के कामगारांचे मत आहे की, जर त्यांना रिमोट वर्कची सोय मिळाली तर त्यांना कंपनीत रहायला आवडेल. संशोधन आणि सल्लागार फर्म फॉरेस्टरचा अभ्यास करणाऱ्या ६० टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते रिमोट वर्कसाठी कमी पगारावरही काम करू शकतात.
५६ टक्के कर्मचारी म्हणतात की, रिमोट वर्कमुळे त्यांची उत्पादकता वाढली तर ६१ टक्के म्हणतात की, ८ तासांच्या शिफ्टमध्ये ते अधिक काम करू शकतात. परंतु केवळ ५ टक्के एम्प्लॉयर्स मानतात की, रिमोट वर्कने प्रॉडक्टिव्हिटी वाढली. तर ७० टक्के कर्मचारी कार्यालयात जास्त उत्पादक असतात असे मानतात.
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर एलिझाबेथ एम्फ्रेज म्हणतात की, घरात ऑफिससारखे वातावरण निर्माण करण्यासाठी तुमच्या कामाच्या पद्धतीचे स्वत: मूल्यांकन करणे आवश्यक आहे. काहींना घरात ऑफीसची उणीव भासते किंवा घरून काम करताना ऑफिससारखी फिनिशींग होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांची घरून काम करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे घरून काम करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
ऑफीसमध्ये काम करताना आपण आपले कौशल्ये अपग्रेड करत राहतो. रोज नवीन काहीतरी शिकायला किंवा करायला मिळते. पण जेव्हा घरातून काम करतो तेव्हा ही प्रक्रिया थांबते. म्हणून घरून काम करतानाही आपले स्कील्स पॉलिश होतील याची काळजी घ्यावी. घरातून काम करताना प्रवासाचा वेळ वाचतो. तो वेळ नवीन काहीतरी शिकण्यासाठी वापरावा. यामुळे व्यावसायिकता टिकून राहते.
क्राऊन मीडियाचे सीईओ वान्या लुकास सांगतात की, ऑफीसमध्ये असताना आपण मार्केट किंवा आपल्या प्रोफेशन विषयी अपडेटेड असतो. अशा परिस्थितीत नवीन संधींची आपल्याला पूर्ण जाणीवही असते. पण ही सवय आपण घरून काम करत असतानाही सुरू ठेवायला हवी. इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपला पोर्टफोलिओ आणि अनुभव लोकांसमोर ठेवू शकतो.
ऑफीसमध्ये काम करताना आपण फक्त आपल्या कामापुरते मर्यादित न राहता विविध पैलूंबाबत अपडेट राहतो. घरातून काम करतानाही स्वतःला मर्यादित ठेवू नका. तुमचे क्षितीजे रुंदवा, वेगवेगळ्या गोष्टींसह अपडेट रहा.
टार्गेट सेट करून काम केल्याने ते वेळेत आणि योग्यप्रकारे पूर्ण होते. पण घरी याकडे थोडे दुर्लक्ष होते. ते होऊ देऊ नका. स्वतःचे ध्येय सेट करा आणि कामात नवीनपणा आणा. त्यामुळे तुम्ही कायम डिमांडमध्ये रहाला आणि कौशल्ये सुधारतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.