आजकाल प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. प्रत्येकाला दिवसाच्या चोवीस तासांचे नियोजन करावे लागते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक फक्त आणि फक्त काम करत असतात. ऑफिस मधील घरातील काम त्यांना मोकळा वेळ घेऊ देत नाहीत.
पण या धावपळीत लोक स्वतःला वेळ देना विसरतात. त्यामुळे आजकाल कामाचा तणाव आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम वाढले आहेत. अनेक लोकांनी कामाचा ताण सहन होईना म्हणून आत्महत्या केल्या आहेत. (Stress Management Tips)
कामाला वेळ दिला तर घरचे ओरडतात आणि घरच्यांना वेळ पाण्याचा विचार केला तर ऑफिसमधील काम पेंडिंग पडतात. काम आणि घर ह्या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करायच्या असं कोड प्रत्येकाला पडलेला असतं. तुम्ही याच गोष्टीला सामोर जात असेल तर काही टिप्स तुमच्या काम येतील.
स्वत:ला तणावमुक्त ठेवण्यासाठी तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही परिस्थितींकडे बघा. वाईट गोष्टी लवकरच बदलतील, अशी आशा बाळगा.
वाईट काळातही संयम ठेवा आणि योग्य विचार करून निर्णय घ्या. सकारात्मक विचारसरणी असलेले लोक नेहमीच तणाव आणि वाईट परिस्थितींना तोंड देण्यासाठी योग्य मार्ग शोधतात.
आजकाल अनेकांना कामामुळे वैयक्तिक जीवनासाठी वेळ मिळत नाही. पण हे करण्यासाठी तुमच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे फार महत्वाचे आहे. यासाठी जी कामे खूप महत्त्वाची आहेत ती आधी करा.
जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही तर ऑफिसमधून लवकर घरी जा आणि रात्री त्यांच्यासोबत जेवा आणि बोला. जे लोक कुटुंबापासून दूर राहतात त्यांच्याशी फोनवर बोलावे.
वेळ वाया कुठे जातो हे शोधा
तुमचे प्राधान्यक्रम सेट करा
कामाच्या दरम्यान स्वतःसाठी ब्रेक घ्या.
यासाठी कामांची यादी बनवा
वेळेची मर्यादा निश्चित करा
जर तुम्हाला खूप थकवा किंवा तणाव वाटत असेल, तर कामाच्या ठिकाणी तुमच्या कोणत्याही सहकाऱ्याची किंवा कर्मचारी किंवा पर्यवेक्षकांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. मदत मागून कामाचा ताण कमी करता येतो. इतरांची मदत घेतली तर कमीपणा येत नाही.उलट एखादं काम समजत नसेल तर ते पटकन समजते. व त्यामुळे, काम लवकर पूर्ण होते.
मित्र किंवा कुटुंबियांसोबत ट्रिपला जाण्याचा बेत करा. जर तुम्हाला अनेक दिवसांची सुट्टी मिळत नसेल तर वीकेंडला तुमच्या घराजवळ कुठेतरी फिरायला जा. मित्रांसोबत एकत्र जेवण करा आणि तुमचे विचार त्यांच्याशी शेअर करा. यामुळे तुमचे मन हलके होईल.
कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही मोबाईलला कमी वेळ द्या अन् तो वेळ मुलांसोबत घालवा. पत्नीला डेटवर घेऊन जा. मुलांसोबत पिकनिक प्लॅन करा. आई-वडिलांसोबत हॉस्पिटलला जा. जसं काम महत्त्वाचं आहे तसं कुटुंबही आहे. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीनाही वेळ द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.