कितीही काम करा, ते संपत नाही! वर्कलोड कसा कमी कराल?

ऑफिसमधील वर्कलोडसोबतच ताणही येतो.
workload stress
workload stressesakal
Updated on
Summary

ऑफिसमधील वर्कलोडसोबतच ताणही येतो.

अनेकांना घरी आणि ऑफीसमध्ये कार्यालयीन वेळेपेक्षा ही काम जास्त वेळ करत बसावे लागत असते. त्यामुळे कामाचा प्रचंड ताण वाढलेला असतो. अशावेळी प्रत्येक गोष्टीत चिडचिड होत असते. अशावेळी काय करावे अन् काय करु नये, हेच समजत नाही. ऑफिसमधील वर्कलोडसोबतच ताणही येतो. हा ताण कमी करण्यासाठी आधी वर्कलोड समजून घ्यावा लागेल आणि तो वाढण्यापासून रोखावा लागेल. कामाचा ताण का वाढत आहे, ऑफिसमध्ये वर्कलोड फक्त तुमच्यासोबत होतो आहे का, हे आधी समजून घेण्याची गरज आहे.

workload stress
ऑफिस कलिगवर क्रश आहे?; तर 'ही' खबरदारी नक्की घ्या

बर्‍याच वेळा कार्यालयात असे घडते की, एकाच वेळी बरेच काम करावे लागतात. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे, काम वेळेवर पूर्ण करावे लागणार असले तर तणाव वाढतो. याचे कारण जाणून घेतल्यानंतर नियोजन करून आपल्या कामाचे प्लॅनिंग करा. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वर्कलोडमुळे शरीरावर तणाव अनेक प्रकारे वर्चस्व गाजवू लागतो.

workload stress
ऑफिस मिटींगला जाण्यापूर्वी फॉलो करा 'या' महत्त्वपूर्ण गोष्टी

वर्कलोडचा प्रभाव

जास्तवेळ वर्कलोडचा प्रभाव हा शार्ट टर्म आणि लाँग टर्ममुळे होतो.

शार्ट टर्म

वर्कलोडमुळे थकवा हळूहळू वाढत जातो. यामुळे तुमचे कुटुंब, मित्र आणि सामाजिक सोशल सर्कलमध्ये फरक पडतो. तसेच तुमच्या वागण्यातही बदल होतो.

लाँग टर्म

काही जणांना लाँग टर्म तणाव आणि चिंतेत असल्यावर जास्त खाण्याची इच्छा असते. त्यामुळे वजन वाढते. अशा अनेक प्रकारच्या विकारांचा धोका वाढतो. म्हणूनच वर्कलोड मॅनेज करायला शिकणे खूप महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.