World Anaesthesia Day 2024 : जागतिक ऍनेस्थेशिया दिवस १६ ऑक्टोबरलाच का साजरा केला जातो?

Anaesthesia : ऍनेस्थेसियाचा शोध लागण्यापूर्वी कशी केली जायची शस्त्रक्रीया?
World Anaesthesia Day 2024
World Anaesthesia Day 2024 esakal
Updated on

World Anasthecia Day 2024 :

दरवर्षी 16 ऑक्टोबर हा 'जागतिक भूल दिन' (World Anaesthesia day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वैद्यकीय शास्त्रात भूल देण्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले जाते. रुग्णावर शस्त्रक्रिया होत असताना भूल देणे किती महत्त्वाचे आहे? आज आम्ही तुम्हाला ऍनेस्थेसियाचा शोध लागण्यापूर्वी शस्त्रक्रिया कशी केली जात होती याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

एखाद्या रुग्णावरती सर्जरी करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट केली जाते. आणि ती गोष्ट झाल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही. या गोष्टीला शास्त्रीय भाषेत ऍनेस्थेसिया तर बोली भाषेत भूल देणे म्हणतात. एखाद्या व्यक्तीला भूल देणे खूप महत्त्वाचा आहे. भूल दिल्यानंतरच संबंधित व्यक्तीवरती सर्जरी करता येते. जर एखाद्या व्यक्तीला भूल चढली नाही तर त्या व्यक्तीचे ऑपरेशन रद्द केले जाते .

World Anaesthesia Day 2024
World Anaesthesia Day: ॲनेस्थेशियाने बदलली विज्ञानाची दिशा! कसा लागला शोध?

१६ ऑक्टोबर हाच दिवस का निवडला ?

विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टरने पहिल्यांदा इथर ऍनेस्थेसियाचा शोध लावला तेव्हा १६ ऑक्टोबरचा दिवस इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवला गेला. १८४६ मध्ये त्यांनी बोस्टन, एमए, यूएसए येथील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये इथर ऍनेस्थेसियाचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक केले. त्याच्या वापरामुळे, रुग्णांना शस्त्रक्रियेदरम्यान वेदना जाणवत नाही.

आपल्या शरीरावरती साधा चाकूने कट बसला तरी आपल्याला वेदना होतात. मग सर्जरीमध्ये जेव्हा आपलं शरीर कापून ऑपरेशन करून पुन्हा ते टाक्यांनी स्टिच केलं जातं तेव्हा भयंकर वेदना होतात. या वेदनांपासून वाचवणारी गोष्ट म्हणजे ऍनेस्थेसिया होय.  

ऍनेस्थेसिया कसे काम करते

ऍनेस्थेशिया रूग्णाच्या शरीरात टोचल्यानंतर त्यांच्या ब्रेनपर्यंत पोहोचणाऱ्या व्हेसल्स बधिर पडतात. मनुष्य शुद्धीत नसतो. त्यामुळे कुठलीही सर्जरी करताना रूग्णाला त्यांच्या वेदना जाणवत नाही. मात्र याचा प्रभाव संपताच मानवी संवेदना परत येतात. ऍनेस्थेशिया श्वसन मास्क किंवा ट्यूबच्या माध्यमातून विंडपाइपमध्ये सोडल्या जातो.

शरीरावरील एकाच भागाला करते सुन्न

ऍनेस्थेसियाचा उपयोग शरीराच्या विशिष्ट भागाला सुन्न करण्यासाठी देखील केला जातो. आपल्या शरीरावरील कुठल्या भागावर शस्त्रक्रिया करताना आपल्या शरीराचा एक छोटासा भाग सुन्न करते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा त्वचेच्या बायोप्सीसारख्या कमी प्रक्रियेसाठी ही भूल दिली जाते. ज्यामध्ये तुम्ही डॉक्टरांशी संवाद साधतही ऑपरेशनला सामोरे जाऊ शकता.

World Anaesthesia Day 2024
World Anaesthesia Day: ॲनेस्थेशियाने बदलली विज्ञानाची दिशा! कसा लागला शोध?

संपूर्णपणे बेशुद्धीचे औषध

याला “ट्वायलाइट स्लीप” असेही म्हणतात. हे बेशुद्धीचे औषध तुम्हाला अशा बिंदूपर्यंत आराम देते जिथे तुम्ही झोपून जाल परंतु संवाद साधण्याची गरज भासल्यास जागे होऊ शकता. अनेकदा हे औषधाने केल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या उदाहरणांमध्ये शहाणपणाचे दात काढणे, कार्डियाक कॅथेटेरायझेशन आणि काही कोलोनोस्कोपी यांचा समावेश होतो.

World Anaesthesia Day 2024
Surgery मध्ये 'या' रूग्णांना ॲनेस्थेशिया दिला जात नाही, काय आहे Pre-Anaesthesia चेकअप?

ऍनेस्थेसियाचा शोध लागण्यापूर्वी कशी केली जायची शस्त्रक्रीया

पूर्वीच्या काळात लोकांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी नायट्रस ऑक्साईडसारखे वायू, इथर किंवा क्लोरोफॉर्मच्या वाफेचा वापर करून रूग्णांना बेशुद्ध केले जायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.