World Bicycle day 2024: या देशाचे पंतप्रधान मर्सिडीज-BMW तून नाही, तर सायकलने जातात संसदेत, संपूर्ण देश आहे सायकलप्रेमी

देशात आठवड्यातील एक दिवस सायकल डे असतो
World Bicycle day 2024
World Bicycle day 2024esakal
Updated on

World Bicycle day : 

भरदाव गाड्यांच्या जगात दोन चाकाची, पायाने चालवली जाणारी सायकल आता मागे पडली आहे. शाळेची मुलं आवड म्हणून सायकल चालवतात. पण, खरं तर सायकल आपल्या आरोग्यासाठी, वातावरणासाठी उत्तम मानली जाते. त्यामुळे आपला व्यायाम होतो आणि हवेचे प्रदुषणही होत नाही. पण सर्वांनाच वेगाशी स्पर्धा करायची असते. त्यामुळे सायकल चालवणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.

अशा वातावरणात एक बातमी दिलासादायक आहे ती म्हणजे जगात असा एक देश आहे जो सायकल प्रेमी बनत चालला आहे. जिथले लोक आवडीने सायकलचा वापर करतात. इतकेच काय तर, या देशातील पंतप्रधानही सायकलनेच ऑफिसला जातात.  

World Bicycle day 2024
Most Expensive Bicycles : मर्सिडीज, ऑडीपेक्षा महाग आहेत या सायकल्स, पाहा फोटो

नेदरलँड्सच्या ॲमस्टरडॅममधील लोकांसाठी सायकल चालवणे हा सवयीचा भाग बनला आहे. ॲमस्टरडॅममध्ये सायकल चालवणे इतके लोकप्रिय आहे की नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट हे देखील सायकलवरून संसदेत आणि कार्यालयात जातात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण वाहतुकीचे सर्वात सोपे साधन म्हणून सायकलचा वापर करतात. सायकलिंगची ही संस्कृती केवळ ॲमस्टरडॅममध्येच नाही तर डच लोकांमध्येही आहे.

सायकलची आणि आपली ओळख अनेक वर्षापासूनची आहे. 1950 आणि 60 च्या दशकात ॲमस्टरडॅम आणि इतर शहरांमध्ये कारची संख्या वाढतच गेली. असे झाल्यास रस्ते मोटारींच्या ताब्यात जातील, अशी भीती सायकलस्वारांना होती.

World Bicycle day 2024
World Bicycle Day 2024: सायकल चालवण्याचा आनंद घ्यायचा असेल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी

आज नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅम हे शहर जगाची सायकल राजधानी बनले आहे. तेव्हा 20 व्या शतकाच्या सुरुवातीस डच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सायकली होत्या. सायकल हे स्त्री-पुरुषांसाठी उच्चभ्रू वाहतुकीचे साधन मानले जात असे. पण युद्धानंतरच्या काळात डच अर्थव्यवस्थेत भरभराट झाल्यामुळे, अधिक लोक कार घेऊ शकले.

कारची संख्या वाढल्याने अपघातही मोठ्या प्रमाणात झाले. तेव्हा या अपघातावर आळा घालण्यासाठी रस्त्यांवर स्पीड लिमिट असावे, तसेच, रस्यावर गाडी, सायकल यांच्यासाठी वेगळे रस्ते बनवावे, यासाठी लोकांना आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि नेदरलॅंडमध्ये सायकलस्वारांसाठी वेगळे रस्ते बनवले गेले.

World Bicycle day 2024
World Bicycle Day: सायकल चालवण्याने हृदयरोगाचा धोका होतो कमी

इंधनाच्या वाढत्या किंमती आणि सायकलचे आरोग्यासाठी असलेले फायदे यामुळे डच लोक पुन्हा सायकलिंगकडे वळले. आता तिथे आठवड्यातील एक दिवस सायकल डे असतो. ज्यादिवशी सर्वच लोक सायकलने प्रवास करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.