World Blood Donor Day २०२४: रक्तदान कोण करू शकते? जाणून घ्या तज्ज्ञांकडून रक्तदानाशीसंबंधित महत्वाच्या गोष्टी

World Blood Donor Day 2024: रक्तदानाविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १४ जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो.
World Blood Donor Day 2024
World Blood Donor Day 2024Sakal
Updated on

World Blood Donor Day 2024: मानवी शरीरात रक्त महत्वाची भुमिका बजावतो. रक्ताद्वारे ऑक्सिजन शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचून शकतो. अनेक वेळा अपुरा आहार, अपघात यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशावेळी शरीराला अतिरिक्त रक्ताची गरस असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असते तेव्हा कोणा एका व्यक्तीला रक्तदान करावे लागते.

आजकाल लोक रक्तदान करायला घाबरतात. रक्तदान केल्यावर अशक्तपणा, थकवा आणि शारिरिक वेदनांना सामोरे जावे लागते असे वाटते. रक्तदानाविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १४ जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. पण रक्तदान कोणी करावी हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

१) कोणत्याही व्यक्तीने रक्तदान करताना क्षमता तपासावी. तसेच कोणताही अनुवांशिक रोग नसेल याची खात्री करावी. तज्ज्ञांच्या मते रक्तदानाचे वय १८ ते ६० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. निरोगी आणि तंदुरूस्त व्यक्ती तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते.

२) रक्तदान करणे हा श्रेष्ठ दान मानले जाते. परंतु जर एखाद्या व्यक्तीचे हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा कमी असेल तर त्याने रक्तदान करू नये. हिमोग्लोबिन १२.५ ग्रॅमपेक्षा कमी असणे म्हणजे तुमच्या शरीरात आधीच रक्ताची कमतरता आहे. अशावेळी तुम्ही रक्तदान केल्यास तुम्हाला अनेक समस्यांचा धोका असतो.

३) रक्तदान करण्यापूर्वी शरीराला व्यवस्थित आराम आणि हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. रक्तदान करण्यापूर्वी रात्री आरोग्यदायी खाद्यपदार्थांचे सेवन करावे. रक्तदान करण्यापूर्वी व्यक्तीने चांगली विश्रांती घेतली पाहिजे. रक्तदानाच्या २४ तास आधी पुरेसे पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि रक्तदान करताना अशक्तपणा जाणवणार नाही.

World Blood Donor Day 2024
Sweet Corn: पावसाळ्यात मक्याचे कणीस खाल्ल्यावर पाणी का पिऊ नये? वाचा तज्ञ काय सांगतात

४) रक्तदानानंतर योग्य आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. रक्तदानानंतर पाणी, ज्यूस, नारळपाणी आणि इतर पदार्थांचे भरपूर सेवन करावे. रक्तदानानंतर सुमारे १२ तास कठोर व्यायाम किंवा वेटलिफ्टिंगसारख्या गोष्टी करू नका. या काळात फक्त विश्रांती, खाणे आणि पाणी पिण्यावर लक्ष द्यावे.

५) रक्तदान केल्यानंतर काही लोकांना अशक्तपणा, चक्कर येणे आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर घाबरू नका. शांत बसा आणि आराम करा.

६) रक्तदान केल्याने दरवर्षी लाखो जीव वाचवता येतात. पण जर तुम्हाला दमा, रक्तस्त्राव विकार, थॅलेसेमिया, सिकलसेल ॲनिमिया, पॉलीसिथेमिया व्हेरा, हिपॅटायटीस बी, क्षयरोग, कुष्ठरोग यासारखे आजार असेल तर रक्तदान करू शकत नाही. प्रसूतीनंतर १२ ते १८ महिने महिला रक्तदान करू शकत नाहीत. जर तुम्हाला रक्तदान करायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.