World Brain Day 2024 : मेंदू चोरला, त्यांच्या मेंदूचे 240 तुकडे केले गेले, सर्वात बुद्धिमान शास्त्रज्ञासोबत असं का घडलं?

Albert Einstein Brain : आईनस्टाईन यांनी 1915 मध्ये सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत विकसित केला. केवळ सहा वर्षांनंतर, 1921 मध्ये, त्यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले.
World Brain Day 2024
World Brain Day 2024esakal
Updated on

World Brain Day 2024 :

जगातील महान भौतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन (albert Einstein) यांनी जगाला ऊर्जेचे सूत्र दिले. आईनस्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडला होता. क्वांटम मेकॅनिक्स सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 1921 चा नोबेल पुरस्कार त्यांना प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" देऊन त्यांचा सन्मान केला गेला.  

अशा या थोर शास्त्रज्ञांच्या बाबतीत एक धक्कादायक घटना घडली होती. आईनस्टाईन यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मेंदू चोरीला गेला होता. आणि त्यांच्या मेंदूसोबत वाईट कृत्यही करण्यात आले होते. आज जागतिक मेंदू दिवस आहे. त्यामुळेच आपण शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांच्यासोबत घडलेली महत्त्वाची घटना जाणून घेऊ.

World Brain Day 2024
Brain Stroke Risk: या सवयी असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका सर्वाधिक, लगेच सवयी बदला, नाहीतर...

अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 रोजी जर्मनीतील वुर्टेमबर्ग येथील उल्म नावाच्या ठिकाणी झाला. त्याचे पालक धर्मनिरपेक्ष ज्यू होते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी जेव्हा त्याने पहिल्यांदा कंपास पाहिला तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. यामुळे त्याच्या मनात विश्वातील अदृश्य शक्तींबद्दल आकर्षण निर्माण झाले.

वयाच्या 12 व्या वर्षी पहिल्यांदा भूमितीचं पुस्तक पाहिलं आणि प्रेमाने ते त्याला पवित्र ग्रंथ म्हणू लागले. आईनस्टाईन यांनी 1915 मध्ये सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत विकसित केला. केवळ सहा वर्षांनंतर, 1921 मध्ये, त्यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले.

World Brain Day 2024
Brain Stroke Risk: या सवयी असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका सर्वाधिक, लगेच सवयी बदला, नाहीतर...

18 एप्रिल 1955 रोजी अल्बर्ट आइनस्टाईन यांचे पोटाच्या गंभीर समस्यांमुळे रुग्णालयात निधन झाले. कुरळ्या केसांमुळे जगभर ओळखल्या गेलेल्या आईनस्टाईनच्या मृत्यूनंतर त्यांचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्याच्या मृत्यूपूर्वी रात्री 1:15 वाजता, या महान शास्त्रज्ञाने जर्मनमध्ये काही शब्द बोलले होते, त्या वेळी प्रिन्स्टन हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या नर्सला जर्मन भाषा येत नव्हती. त्यामुळे या महान शास्त्रज्ञाचे शेवटचे शब्द कायमचे हरवले.

World Brain Day 2024
Brain Chip Implant: इलॉन मस्कच्या 'न्यूरालिंक'ने पहिल्यांदाच रुग्णाच्या डोक्यात बसवली चिप, मानवी चाचणीला सुरुवात

शरीरातून मेंदू गायब असल्याचा दावा मुलाने केला होता.

आईनस्टाईन यांच्या मृत्यूनंतर त्यांना न्यू जर्सीच्या ट्रेंटन येथे दफन करण्यात आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांचा मुलगा हॅन्स अल्बर्टने दावा केला की, शवपेटीत ठेवलेला आईनस्टाईनचा मृतदेह पूर्ण नाही. माझ्या वडिलांचा मेंदू गायब आहे असे त्याचे म्हणणे होते.

त्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या पहिल्या पानावर याबद्दल एक लेख प्रकाशित केला होता. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, आईनस्टाईन यांचा मेंदू, ज्यामुळे सापेक्षता सिद्धांत आणि न्यूक्लियर फ्यूजनचा विकास शक्य झाला होता, ते अभ्यासासाठी बाहेर काढले गेले होते.

World Brain Day 2024
World Brain Tumor Day 2024 : किरणोत्सर्गामुळे वाढली ब्रेन ट्युमरची जोखीम

डॉ. थॉमस हार्वे, ज्या डॉक्टरने त्यांचे पोस्टमॉर्टेम केले, त्यांनी आईनस्टाईनचा मेंदू त्यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय काढून घेतला होता. डॉ. थॉमस हार्वे, ज्या डॉक्टरने त्यांचे पोस्टमॉर्टेम केले, त्यांनी आईनस्टाईनचा मेंदू त्यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय काढून घेतला होता.

म्हणून, पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी मेंदू बाहेर काढला

डॉ.हार्वे म्हणाले होते की, जगातील या सर्वात प्रतिभावान व्यक्तीच्या मेंदूचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक होते. आईनस्टाईन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यास मनाई केली असली तरी त्यांचा मुलगा हॅन्स यांनी डॉ. थॉमस हार्वे यांना त्यांच्या मेंदूचा अभ्यास करण्याची परवानगी दिली होती. (World Brain Day 2024)

मेंदूचे तुकडे संशोधनासाठी पाठवण्यात आले

तेव्हा डॉ.हार्वे यांनी आइनस्टाईनच्या मेंदूची डझनभर छायाचित्रे घेतली होती. यानंतर त्याच्या मेंदूचे 240 तुकडे करून इतर काही शास्त्रज्ञांकडे संशोधनासाठी पाठवण्यात आले. डॉ.हार्वे यांनी आईनस्टाईनच्या मेंदूचा काही भाग सायडर बॉक्समध्ये इतर शास्त्रज्ञांना संशोधनासाठी पाठवला होता, असे म्हटले जाते.

World Brain Day 2024
World Brain Day : मुलांची बुध्द्धी होईल तल्लख! त्यांच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश...

1985 साली डॉ. हार्वे यांनी आइनस्टाईनच्या मेंदूवर एक शोधनिबंध प्रकाशित केला. त्यात त्यांनी लिहिले होते की हा मेंदू सरासरी मेंदूपेक्षा वेगळा दिसतो. म्हणूनच ते वेगळ्या पद्धतीने कार्य करू शकले. आईनस्टाईन यांचा मेंदू न्यूरॉन्स आणि ग्लिया या दोन पेशींच्या असामान्य गुणोत्तरानं तयार झाला होता.  

सध्या आइन्स्टाईनचा मेंदू फिलाडेल्फिया येथील मटर म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. हे विशेष जारमध्ये रसायनांसह संरक्षित केले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.