जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जगभरात दरवर्षी कॅन्सरसारख्या घातक आजाराने करोडो लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे या आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक कर्करोग दिन सुरू करण्यात आला आहे. जागतिक कर्करोग दिन जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे दरवर्षी एका विशेष थीमसह साजरा केला जातो. यावर्षी जागतिक कर्करोग दिनाची थीम "क्लोज द कॅन्सर केअर गॅप" अशी आहे.
भारतातही कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. नॅशनल कॅन्सर रेजिस्ट्री प्रोग्रामच्या अहवालानुसार 2020 पर्यंत भारतातील ६७९,४२१ पुरुष कर्करोगाने ग्रस्त होते. 2020 मध्ये कर्करोगाने पीडित महिलांची संख्या 712,758 होती. 2020 मधील हा अहवाल दर्शवितो की भविष्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कर्करोगाची अधिक प्रकरणे दिसून येतील. जागतिक कर्करोग दिनाच्या या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला भारतातील महिलांमध्ये आढळणारे 5 कर्करोग आणि त्यांची लक्षणे सांगणार आहोत.
हे 5 प्रकारचे कर्करोग भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळतात
खराब जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान आणि खाण्याच्या सवयींमुळे भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कर्करोगाची अधिक प्रकरणे दिसतात, याचे मुख्य कारण आहार आणि हार्मोनल बदलांशी संबंधित आहे. महिलांमधील कर्करोगाविषयी जाणून घेऊया.
भारतातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. आकडेवारीनुसार, ग्रामीण महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्तनाच्या पेशी असामान्यपणे वाढतात. अशा परिस्थितीत महिलांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
स्तनामध्ये गाठ येणे
स्तनामध्ये दुखणे
स्तनाग्रातून दुधाव्यतिरिक्त द्रव स्त्राव
स्तनावरील त्वचा सुरकुतलेली दिसणे
स्तनाच्या आकारात कोणताही बदल होणे
स्तनाच्या कर्करोगानंतर, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजेच सर्व्हिक्स किंवा ग्रीवा. मेयो क्लिनिकच्या मते, गर्भाशय ग्रीवा हा गर्भाशयाचा खालचा भाग आहे, जो योनीमार्गाला जोडतो.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये अचानक होणारी वाढ यासाठी कारणीभूत ठरते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग बहुतेकदा मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) मुळे होतो. एचपीव्ही लसीद्वारे हा कर्करोग टाळता येऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
पाळी दरम्यान किंवा लैंगिक संभोगानंतर अनियमित किंवा असामान्य योनी रक्तस्त्राव
पाठीच्या खाली वेदना किंवा पायात वेदना
वजन कमी होणे
भूक कमी लागणे
दुर्गंधी स्त्राव किंवा योनि अस्वस्थता
दोन्ही पायांना सूज
स्त्रियांमध्ये हा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठे आतडे व गुदाशयाचा कर्करोग हा जगभरात सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या कर्करोगांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा आजार आहे. या आजाराच्या रुग्णांमध्ये दरवर्षी दहा लाखांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत असते. डॉक्टर म्हणतात की कोलोरेक्टल कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा कोलनमधील पेशी त्यांच्या डीएनएमध्ये बदल विकसित करतात.
पचन समस्या असणे
अचानक वजन कमी होणे
थकवा आणि कमकुवत वाटणे
पोटदुखी
वारंवार गॅस होणं
अंडाशयाच्या कर्करोगाची प्रकरणे 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये अधिक सामान्य आहेत. सामान्य भाषेत, या कर्करोगाला सायलेंट किलर देखील म्हटले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रजोनिवृत्तीचे वय उलटून गेलेल्या महिलांना हा आजार होण्याची दाट शक्यता असते.
भारतातील महिलांना होणाऱ्या एकूण कर्करोगांमध्ये अंडाशयाचा कर्करोग तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात या आजाराचे प्रमाण जवळपास ६.७ टक्के असून कर्करोगांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी जवळपास ३.८ टक्के मृत्यू या आजारामुळे होतात.
भूक न लागणे
पोट फुगणे
ओटीपोटात दुखणे किंवा पोट भरलेले असल्यासारखे वाटणे
पाठदुखी
अपचन
बद्धकोष्ठता
वारंवार लघवी होणे
मासिक पाळी अनियमित असणे
योनीतून स्राव येणे
गेल्या काही वर्षांत तोंडाचा कर्करोग झपाट्याने पसरला आहे. अनेकजण आजकाल कर्करोगाचे शिकार झालेले दिसतात. तंबाखू, सिगारेट, गुटखा खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. आजाराची सुरुवातीचे लक्षणं लवकरात लवकर लक्षात येणे महत्वाचे आहे. काही वेळेस या आजाराची लक्षणं लक्षात येत नाही आणि परिणामी हा आजार रौद्र रूप धारण करतो.
तोंडाचा कर्करोग झाल्यानंतर तोंडात गालाच्या आतल्या बाजूला फोड येणे
तोंडात इजा होणे
ओठ फाटणे
जखम सहजसाहजी न भरणे
तोंडाच्या आतल्या बाजूला पांढरा फोड येणे
तोंडातून दुर्गंध येणे
आवाज बदलणे
आवाज बसणे
जास्त लाळ किंवा रक्त येणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.