World Cancer Day : हातावरल्या मेहंदीचा रंगही उतरला नव्हता तोवर कॅन्सरशी गाठ पडली!ती लढली अन् उभी राहीली

शर्मिष्ठा मात्र विचारांच्या गर्तेत भेलकाडूंन गेली. कॅन्सर असेल हा?
World Cancer Day
World Cancer Dayesakal
Updated on

World Cancer Day :

अत्यंत देखणी, सुशील आणि हसतमुख! कोल्हापूरच्या बिनखांबी गणेश मंदिराजवळ राहणारी शर्मिष्ठा... लग्नही झालं. बांधकाम व्यावसायिक म्हणून यश, कीर्ती, संपत्ती असणाऱ्या प्रताप गायकवाड यांच्या मुलाशी - म्हणजेच राजेश गायकवाड यांच्याशी तिचा विवाह संपन्न झाला. दोन्ही घराणी मोठी. दिमाखात झालेला लग्नसोहळा, हौस-मौज यानंतर नवविवाहित जोडपे महाबळेश्वरला गेले...

स्वर्गीय सुख, सहवास, प्रेम यात आकंठ असे ते जोडपं. आठ-दहा दिवसांनी हे जोडपे कोल्हापूरला परतले.. शर्मिष्ठा माहेरी गेली. तर राजेश व्यवसायात मग्न झाले. परस्परांच्या आठवणी, गोड सहवास यात शर्मिष्ठा होती. मैत्रीणीही चेष्टामस्करी करून, गोड आठवणी ताज्या करत होत्या. विरह अधिक तीव्र करत होत्या.

World Cancer Day
World Cancer Day : कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण वाढतेय ; जागतिक कर्करोग दिन,महिलांनीही दक्ष राहण्याची गरज

माहेरपणाचे हेच कौतुक सुरू असताना, आपल्या छातीत एक गाठ असल्याचे शर्मिष्ठाला जाणवले आणि ती ढासळली. मोठ्या बहिणीला अशाच गाठीनं, कॅन्सर उपचार-वेदना-त्रास झालेला तिनं जवळून पाहिला होता.

हातावरची मेंदी ताजी असतानाच, नशीबानं हा कोणता रंग लावला? असंच तिला वाटलं. चेहऱ्यावरच्या आनंदाची जागा - अस्वस्थतेनं घेतली... राजेशच्या आठवणीनं सुखावणारं मन, काळजीनं धडधडू लागलं !

ही परिस्थिती, अवस्था तिनं जवळच्या मैत्रिणीकडं व्यक्त केली. मैत्रिणीने तर नवं लग्न झालंय! हनिमूनही झालाय ! असा मस्करीचा सूर लावला. तारुण्यसुलभ भावनांचाच तो संवाद ! मैत्रिणीला गंभीरता किंवा नेमकं काय असेल हे समजलच नाही !

World Cancer Day
Cancer Medicine : गोगलगाईच्या श्र्लेष्मात सापडलं चक्क कर्करोगाचे औषध, जुन्नरच्या महाविद्यालयाचे संशोधन; ‘NCL’ चाही सहभाग

शर्मिष्ठा मात्र विचारांच्या गर्तेत भेलकाडूंन गेली. कॅन्सर असेल हा? मोठ्या बहिणीसारख्या वेदना आता सोबत असतील का? हारिसरच्या मंडळींना वाटेल, आधीच आपल्याला कॅन्सर होता की काय ? फसवणूक झाली ! असं कदाचित वाटेल त्यांना !

दोन्ही कुटुबात तणाव निर्माण होतील. गैरसमज, आरोप यातून आपला नवा संसार झाकोळला जाईल. राजेश कसे वागतील? की तेही संशय घेतील? अशा विचारात शर्मिष्ठा गुंतत चालली. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात, ते खरंच !

मुलीला आई ही मैत्रिणीसारखीच असते. शर्मिष्ठानं गाठीबद्दल आईला सांगितलं. आईनं काळजीनं बाबांनाही सांगितलं. 'घाबरू नकोस! गाठ कशाची आहे न समजताच तू तर्क लढवून निराश होऊ नकोस!' आईबाबांनी सल्ला दिला.

माहेरचा हा दिलासा आश्वासक होताच... पण खरी भीती होती सासरच्या प्रतिक्रियेची ! स्वीकारतील ते अशी रोगग्रस्त सून? त्यांची स्वप्नं, सुनेबद्दलच्या अपेक्षा धुळीस तर मिळणार नाहीत? काय होईल? या काहुरानं तिचं मन सैरभैर झालं... डॉ. ठकार यांचेकडे तपासणी झाली. सौ. ठकार डॉक्टरांनी पण

शर्मिष्ठाला धीर दिला... समजूत घातली... गाठीची बायोप्सी केली गेली... आणि कॅन्सर असल्याचे सिद्ध झाले. जी भीती होती, ती खरी ठरली. मनानं जे चिंतलं - भीती ज्याची होती, तोच कॅन्सर...

World Cancer Day
Cancer Medicine : गोगलगाईच्या श्र्लेष्मात सापडलं चक्क कर्करोगाचे औषध, जुन्नरच्या महाविद्यालयाचे संशोधन; ‘NCL’ चाही सहभाग

डोळ्यासमोर मोठ्या बहिणीच्या वेदना तरळून गेल्या...

सगळे कुटुंबीय एकत्र झाले... राजेश यांना आधी कल्पना द्यावी असे ठरले... जी परिस्थिती आहे, ती लपवायची कशाला? मानवी शरीर - झालेला रोग हा काही मुद्दाम नव्हे! हे विधीलिखित ! नशीब...

दुसऱ्या दिवशी शर्मिष्ठाने राजेशना फोन केला... त्याचं खळाळतं हास्य, चेष्टा, प्रणयी शब्द... मस्ती... प्रेम कानात साठवत असतानाच, शर्मिष्ठाचे मन मात्र तणावग्रस्त होत होते... काय सांगायचं नवऱ्याला ? इतका आनंदी-उत्साही, प्रेमळ जोडीदार आपला.. राजेश यांना या वादळाची काहीच कल्पना नव्हती !

अंबाबाईच्या देवळात भेटायचं ठरलं ! जणू काही विरह झालेली पत्नी, पतीसाठी आतुरतेची भेट घेणार होती... पण हे नाटक वठवणं शर्मिष्ठासाठी गरजेचं होतं ! देवळाच्या परिसरातील दगडी पायऱ्यांवर बसलेलं हे जोडपं... इतरांच्या दृष्टीनं सुखी, आनंदी होतं...

देवी अंबाबाईच्या मंदिरात आपलं गा-हाणं, मागणी - नवस घेऊन अनेक जोडपी, भक्त-भाविक येतात... मनातील वेदना, म्हणणं भक्तीभावानं देवीच्या चरणी ठेवतात... आज मात्र एक पत्नी, आपल्या पतीसमोर एक दुःख सांगण्यासाठी इथं आली.

शर्मिष्ठा आणि राजेश बोलू लागले... राजेशचा मूड नेहमीचाच ! मस्तीखोर ! चावट आणि आसक्तीचा. !

हास्य, चेष्टा, प्रणयी शब्द... मस्ती... प्रेम कानात साठवत असतानाच, शर्मिष्ठाचे मन मात्र तणावग्रस्त होत होते... काय सांगायचं नवऱ्याला ? इतका आनंदी-उत्साही, प्रेमळ जोडीदार आपला.. राजेश यांना या वादळाची काहीच कल्पना नव्हती !

World Cancer Day
Cervical Cancer : जगातला असा देश जिथे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे अधिक शिकार, दरवर्षी इतक्या महिला पडतात बळी

अंबाबाईच्या देवळात भेटायचं ठरलं ! जणू काही विरह झालेली

पत्नी, पतीसाठी आतुरतेची भेट घेणार होती. पण हे नाटक वठवणं शर्मिष्ठासाठी गरजेचं होतं ! देवळाच्या परिसरातील दगडी पायऱ्यांवर बसलेलं हे जोडपं.इतरांच्या दृष्टीनं सुखी, आनंदी होतं...

देवी अंबाबाईच्या मंदिरात आपलं गा-हाणं, मागणी - नवस घेऊन अनेक जोडपी, भक्त-भाविक येतात. मनातील वेदना, म्हणणं भक्तीभावानं देवीच्या चरणी ठेवतात...

आज मात्र एक पत्नी, आपल्या पतीसमोर एक दुःख सांगण्यासाठी इथं आली.

शर्मिष्ठा आणि राजेश बोलू लागले... राजेशचा मूड नेहमीचाच ! मस्तीखोर ! चावट आणि आसक्तीचा. !

शर्मिष्ठाला फुटलेला हुंदका त्यानं लग्नानंतर पहिल्यांदा ऐकला... "काय झालं गं?"

त्याची आपुलकी-प्रेम-माया नकळत त्याच्या तोंडातून बाहेर पडली... येणारे रडू, हुंदके दाबत - शर्मिष्ठानं कॅन्सर झाल्याची बातमी जिवलगाला सांगितली.

क्षणभर विचलित झाला राजेश ! पण दुसऱ्याच क्षणी, देवळाच्या कळसाकडे बघत तो बोलला...

"अगं, ही लढाई तुझी तशीच माझी... मी आहे ना सोबत ? जग खूप पुढं गेलंय... अन् मेडिकल सायन्सही ! आता आपण लढायचं !'

या वाक्यानं केवळ धीर दिला असं नाही तर एकमेकांविषयीच्या आपुलकीचं, जबाबदारीचं, विश्वासाचं नवं नातंच झळकलं देवीच्या कळसासारखं !

World Cancer Day
World Cancer Day 2024 : प्रोटाॅन बीम थेरपी म्हणजे काय? भारतात ही सुविधा कुठे उपलब्ध आहे?

दुसऱ्याच दिवशी राजेश शर्मिष्ठासह कोल्हापूर कन्सर सेंटरमध्ये आला. बायोप्सीचे रिपोर्ट दिले... घटनाक्रम सांगितला. नुकताच विवाह झालेल्या या तरूणीवरच्या अवघड प्रसंगानं डॉक्टर दाम्पत्यही हेलावून गेले. भावनांशिवाय उपचार होत नसतात... औषधालाही सदिच्छांचा स्पर्श लागतोच ना ?

'शर्मिष्ठा! घाबरायचं नाही अजिबात ! ही कॅन्सरची सुरुवात आहे! चार - पाच किमोथेरपीनंतर तू मस्त बरी होशील... कॅन्सर होता हे ही विसरून जाशील... वेळेवर आला ते फार बरे झाले... आपण निम्मी लढाई तिथंच जिंकली... आता निर्धास्त राहा !

डॉ. पवार यांनी दिलेला हा धीर आश्वासक होता... चिंतेचं सावट कमी झालं.

सासरची माणसं काय वागतील? या चिंतेत शर्मिष्ठा होतीच... पण जेव्हा सासू-सासरे शर्मिष्ठ…

पसरली... कुणाला वाईट वाटलं, तर कोण हळहळलं ! व्यक्ती तितक्या प्रतिक्रिया !

World Cancer Day
World Cancer Day 2024 : भारतात झपाट्याने वाढतोय तोंडाचा कर्करोग, 'या' गंभीर लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

'राजेशची टकली बायको !' असं माघारी बोललं जायचं !

'लग्नाआधी चौकशी करायला हवी होती !' असा अनाहूत सल्ला,

टोमणे, गैरप्रचार, अफवाही... नात्याची ही बाजूही मानवी प्रवृत्ती स्वभाव यावर लख्ख प्रकाश

टाकणारी ठरली ! शर्मिष्ठा पूर्ण बरी झाली... कॅन्सरवर विजय मिळवून पुन्हा

संसारात व्यस्त झाली. तब्येत सुदृढ झाली. पूर्वीसारखेच लांबसडक केस - चेहऱ्यावर हसू आणणारे ठरले ! राजेशने कौतुकाने, अंबाबाई मंदिराजवळील आणलेली वेणी याच केसात माळताना, ती जेव्हा आरशात बघते, तेव्हा जगण्याचा सुगंध, प्रेमाचा ओलावा, डॉ. सूरज-डॉ. रेश्मा व संपूर्ण टीमच्या प्रयत्नांना, राजेश व कुटुंबीयांच्या मायेला नव्याने अनुभवत असते !

(संबंधित कथा कोल्हापूर कॅन्सर सेंटर हॉस्पिटलने प्रसिद्ध केलेल्या 'न हरलेली उदाहरणं' या यशोगाथा पुस्तकातून घेण्यात आली आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.