वयाचे १४ वे वर्ष पूर्ण होण्याआधीच मुलांना काम करायला लावणे हा गुन्हा आहे. तरीही जगभरातील अनेक लोक लहान मुलांना कामाला पाठवतात. त्यामुळेच जगभरात १२ जून हा बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो.
बालमजूरी मुळापासून नष्ट करण्यासाठी आज लोकांना त्याबद्दल जागरुक केले जाते. जागतिक बालकामगार दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. याची लोकांना जाणीव व्हावी यासाठीच हा दिवस साजरा केला जातो.
अनेक लहान मुलांना हे माहितीच नाही की, आपल्या देशात मुलांना जन्मताच काही अधिकार दिले जातात. या अधिकारांमुळे ते स्वत:वर होणाऱ्या अन्यायला वाचा फोडू शकतात. असे कोणते कायदे आहेत, अधिकार आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.
बाल कामगार कायदा १९८६
देशात बालकांना बालमजुरीपासून रोखण्यासाठी कामगार कायदा १९८६ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार,१४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसलेल्या कोणत्याही कामात कामावर ठेवता येणार नाही. तर 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना फिटनेस प्रमाणपत्र असेल तरच कारखान्यात वैगरे काम करता येते. तसेच, कायद्यानुसार त्यांना दिवसातील केवळ साडेचार तास काम करता येणार आहे.
सक्षमीकरणाचा अधिकार
भारतीय राज्यघटनेच्या कलम १५ (३) मध्ये बालकांना सक्षमीकरणाचा अधिकार दिला आहे. कलम २४ अन्वये, १४ वर्षांखालील मुलांना कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास मनाई आहे. तर कलम ३९F अंतर्गत मुलांना मोफत आणि आदरपूर्वक विकसित होण्याची संधी दिली जाते. कलम २१(A) नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण दिले जाईल.
आरोग्याबाबतही कायदे
काही आरोग्यविषयक कायदे मुलांना जन्मापासूनच दिलेले आहेत. यामध्ये सर्व बालकांना चांगल्या आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यासोबतच अपंगत्व असेल तर त्यांना विशेष सुविधा, स्वच्छ पाणी, पोषक आहार, निरोगी राहण्यासाठी स्वच्छ वातावरण या सुविधाही मिळवण्याचा त्याला अधिकार आहे.
शिक्षणासंदर्भातील अधिकार
शिक्षणासंबंधीचे काही अधिकारही मुलांना देण्यात आले आहेत. यामध्ये सर्व अनुदानित खाजगी शाळांमधील उपलब्ध जागांपैकी २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. कलम २१(A) नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण दिले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.