World Disabled Day 2023 : ‘डॉक्टरांच्या चुकीमुळे दिव्यांगत्व आलं, कुटुंबामुळं उभा राहीलो अन् सरकारी नोकरीला लागलो’

मी माझ्यासारख्याच बांधवांना नेहमी मदत करत असतो
World Disabled Day 2023
World Disabled Day 2023esakal
Updated on

World Disabled Day 2023 :

मी साधारण पाच वर्षांचा होतो, तेव्हा अचानक मला ताप आलेला. तो काळ ७० च्या दशकातला. म्हणाव्या इतक्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. ताप अंगात चढला अन् वडिलांनी रुग्णालयात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी नेमके काय उपचार केले हे त्यांनाच माहिती. पण त्यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे माझ्या वाट्याला कायमचं अपंगत्व आलं, असं उमेश कुंभार सांगतात.

उमेश हे सार्वजनिक बांधकाम विभागात सिनिअर क्लार्क आहे. गेली २० वर्ष ते हे काम मनापासून करत आहेत. आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आपण उमेश यांच्या संघर्षमयी जीवनाबद्दल जाणून घेऊयात.


उमेश यांचे पूर्ण नाव उमेश आण्णासाहेब कुंभार असे आहे. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९७३ मध्ये झाला. उमेश यांचे पूर्ण नाव सांगण्याचा उद्देश हाच आहे की, त्यांच्या वाटचालीत वडिलांचा लाखमोलाचा वाटा आहे. कारण, सृदृढ बालक म्हणून जन्माला आलेले उमेश यांना केवळ डॉक्टरांच्या चुकीमुळे पाय कायमचे गमवावे लागले.

World Disabled Day 2023
Citylinc Disability Free Card : दिव्यांग मोफत कार्डला 1 महिन्याची मुदतवाढ!

मुलाच्या वाट्याला अचानक आलेलं हे दु:ख पाहून कोणताही बाप कोलमडला असता. पण पेशाने शिक्षक असलेल्या आण्णासाहेब जरा वेगळेच होते. त्यांनी उमेश यांना केवळ पुन्हा स्वत:च्या पायावर उभंही केलं ते चांगलं शिक्षण देऊन. पोराच्या नशिबाला लागलेला पोलिओ बरा करण्यासाठीही अनेक प्रयत्न त्यांनी केले. 


पुढे उमेश सांगतात की, शाळेत होतो तोवर बाबा आणि मोठे भाऊ शाळेत सोडायला आणायला यायचे. वर्गापर्यंत उचलून घेऊन जायचे. पण ११ वीत असताना कॉलेजला जाताना लाज वाटायची, तेव्हा वडिलांनी मला मारलं, पण त्याच माराने मला आज स्वावलंबी बनवले.

मी बी.कॉमची डिग्री घेतली. त्यानंतर एका खाजगी प्रेसमध्ये डी.टी.पी.ऑपरेटर म्हणून काम केलं. जेव्हा या कामाला जायचो तेव्हा त्यातली बाराखडीही येत नव्हती. पण हळू-हळू शिकत गेलो. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात इम्पॉयमेंटमधून मला कॉल आला. मी तिथे परिक्षा दिली अन् माझी निवड झाली, असेही उमेश यांनी सांगितले.

World Disabled Day 2023
World Disabled Day 2023 : कोणाचा अपघात, तर कोणी जन्मजात दिव्यांग, तरीही अटकेपार झेंडा रोवणाऱ्या चारचौघी

आज मी माझे ऑफिसचे काम सांभाळत मोकळ्या वेळेत डिझायनिंगचे काम करतो. या सगळ्या प्रवासात माझं कुटुंब माझी ताकद होतं आणि नेहमी राहील. आई, दादा-वहिणी, त्यांची मुलं, नातवंड असा बराच मोठा पाठिंबा माझ्या मागे आहे. या सगळ्यांनीही मला कधीही मी वेगळा आहे असं जाणवू दिलं नाही, असंही उमेश म्हणाले.

उमेश यांना गाणी म्हणण्याची आणि ऐकण्याची आवड आहे. मला हा छंद जोपासायचा होता, म्हणूनच मी स्वत:चे एक युट्यूब चॅनलही सुरू केलं आहे. या नव्या टेक्नॉलॉजीशी कनेक्ट होण्यात माझ्या पुतण्याची मोठी मदत झालीय. त्यांनंतर मी बऱ्याच टेक्निकल गोष्टी शिकत आहे. मी स्वत:चं गाणी म्हणतो अन् ती रेकॉर्डही करतो. ही गाणीच माझ्या जगण्याला नवा अर्थ देत आहेत, नवी ओळखही देत आहेत.

World Disabled Day 2023
World Disabled Day 2023 : कोणाचा अपघात, तर कोणी जन्मजात दिव्यांग, तरीही अटकेपार झेंडा रोवणाऱ्या चारचौघी

मी स्वत: ज्या वेदना सहन केल्या आहेत तशा इतरांना लागू नयेत. तसेच, आपण या समाजाचे देणं लागतो हे लक्षात ठेऊन, मी माझ्यासारख्याच बांधवांना नेहमी मदत करत असतो.

शेवटी हेच सांगेन की, I beacaused my family, and I just for my family, कारण वयाची ५० वर्ष या पोलिओसोबत लढण्याची ताकद मला माझ्या कुटुंबामुळेच मिळालीय. त्यामुळे माझ्यासारख्यात सगळ्यांना इतकेच सांगणे आहे की, तुमचा सगळ्यात मोठा पाठिंबा हा तुमचे कुटुंब आहे. त्यामुळे कुटुंब सोबत असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. 

World Disabled Day 2023
World Disabled Day 2023 : दिव्यांग व्यक्तींची काळजी मिटली, सरकार देणार पेन्शन, जाणून घ्या योजनेबद्दल सर्वकाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.