World Environment Day 2024 : ही साधी लुगड्यातली आजी आहे 8000 झाडांची आई, मिळालाय पद्मश्री अन् कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

पर्यावरणवादी थिमाक्का यांना वृक्षमाता म्हणूनही ओळखले जाते
World Environment Day 2024
World Environment Day 2024esakal
Updated on

World Environment Day 2024 :

तुम्ही डेरेदार वृक्षांच्या मधून जाणाऱ्या रस्त्याचा फोटो अनेकवेळा पाहिला असेल. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कडाक्याच्या उन्हात या झाडांमधून प्रवास करणं स्वर्गसुखाहून कमी नाही. कर्नाटकातील तुमकूर जिल्हातून तुम्ही प्रवास केला असेल तर ही लक्ष्यवेधी झाडं तुमचं मन मोहून टाकतील. तर या झाडांची जन्मदात्री सलुमरदा थिम्मक्का या आहेत.

थिमक्का यांचे वय सध्या 113 वर्ष आहे. थिमक्का यांना पद्मश्री पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. तर कर्नाटक सरकारने कॅबिनेट दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सालुमरदा थिम्मक्का यांना पर्यावरण दूत म्हणून कॅबिनेट दर्जा मिळाला आहे.

World Environment Day 2024
World Environment Day: जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? यंदा करा हे 5 संकल्प

थिम्मक्का यांनी गेल्या 80 वर्षांत 8 हजार हून अधिक झाडं लावली आहेत. सलुमरदा थिम्मक्का, मूळचे कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील, आज देशासाठी एक प्रेरणा आहेत. थिम्मक्का वटवृक्षांना आपली मुले मानतात. कारण त्याला स्वतःची मुले नाहीत. त्यांनी आठ हजारांहून अधिक झाडे लावली आहेत.

2019 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वतः डोके टेकवून नमस्कार केला. पर्यावरणवादी थिमाक्का यांना वृक्षमाता म्हणूनही ओळखले जाते.

World Environment Day 2024
World Environment Day: जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? यंदा करा हे 5 संकल्प

थिम्मक्का यांचा जन्म कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात झाला. तिचा विवाह रामनगर जिल्ह्यातील चकिया यांच्याशी झाला होता. आर्थिक अडचणींमुळे, अम्मा सुरुवातीला एका खाणीत मजूर म्हणून काम करत होत्या आणि त्यांना शिक्षण मिळू शकले नाही. म्हणून त्यांनी सूर्यप्रकाश नावाचे मूल दत्तक घेतले.

थिम्मक्कांना लहानपणापासूनच झाडांची आवड होती, त्यामुळे त्याने लहानपणापासूनच वडाची झाडे लावायला सुरुवात केली. दरवर्षी 5 रोपांनी याची सुरुवात केली. दरवर्षी 5-5 झाडे लावली. म्हणजे पहिल्या वर्षी 5, दुसऱ्या वर्षी 10 आणि तिसऱ्या वर्षी 15 अशा प्रकारे हे वेड वाढत गेले.

World Environment Day 2024
World Environment Day 2024 : ‘कोचिंग क्लासमधून मिळणाऱ्या फीच्या पैशातून झाडे लावायला सुरूवात केली’ वाचा ‘झाड प्रेमी’ महिलेची यशोगाथा

हळुहळु वृक्षारोपणाचे हे वेड इतर गावांमध्ये पसरले. थिम्मक्का यांनी आत्तापर्यंत 8 हजार झाडांशिवाय 385 वटवृक्षांची लागवड केली आहे. 2019 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. 2020 मध्ये, त्यांना कर्नाटक केंद्रीय विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. वनस्पतींवरील प्रेमामुळे, थिम्मक्का यांनी आपल्या मुलांप्रमाणेच झाडांची सेवा केली.  

थिम्मक्का यांनी नुकतेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त हुलीकल ते कुदूर दरम्यानच्या 45 किमी महामार्गावर रोपे लावले आहेत. त्या वृक्षांचे जतन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.