World Hypertension Day 2024: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक लोकांना उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जागतिक उच्च रक्तदाब दिन दरवर्षी 17 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस या विषयाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा हे जाणून घेऊया.
कोणती लक्षणे दिसतात
वारंवार चक्कर येणे
थकवा जाणवणे
धूसर दृष्टी
तहान आणि भूक वाढली
थंडी जाणवणे
मॅग्नेशियम समृद्ध आहार
रक्तदाब नियंत्रणात करण्यासाठी आहारात मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असलेल्या अशा पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. मॅग्नेशियम युक्त आहार घेतल्यास नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. मॅग्नेशियम आहारासाठी हिरव्या भाज्या, बिया, सोयाबीन, कडधान्य आणि गहू इत्यादींचे सेवन करावे.
व्हिटॅमिन डी
ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, त्यांनी व्हिटॅमिन डी समृद्ध आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे. दररोज सकाळी काही वेळ सूर्यप्रकाशात बसावे. याशिवाय मासे, चीज, गाईचे दूध, सोया दूध, संत्र्याचा रस, तृणधान्ये आणि दलिया, लोणी, दही, कोबी यासारख्या पदार्थांचा आहारात सेवन करावा.
पोटॅशियमयुक्त पदार्थ
पोटॅशियम युक्त आहार घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. पोटॅशियम शरीरातील पेशी निरोगी ठेवते. रोजच्या आहारात 4,700 मिलीग्राम पोटॅशियम घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही केळी, पालक, बटाटा यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.