World Kidney Day 2024 : डाएटच्या मदतीने ठेवा किडनी निरोगी.. आहारात करा या पदार्थांचा समावेश

किडनी निरोगी ठेवायची आहे? मग या पदार्थांचे सेवन करा
health
healthsakal
Updated on

किडनी हा शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मूत्रपिंड दोन सर्वात महत्वाची कार्ये करते, पहिले ते शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकते आणि दुसरे म्हणजे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन राखते.

किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार आणि उत्तम जीवनशैली आवश्यक आहे. जंक फूड, तेलकट, मसालेदार आणि जास्त मिठाचा आहार यांसारख्या आहारातील काही पदार्थ किडनीला हानी पोहोचवतात. मूत्रपिंडासाठी कोणते अन्न महत्वाचे आहे, ते जाणून घेऊया.

1. सफरचंद

आहारात सफरचंदाचा समावेश केल्यास किडनी निरोगी राहते. सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर असते, ज्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका कमी होतो.

2. हिरव्या भाज्या

पालक, मेथी, चाकवत यांसारख्या हिरव्या भाज्या किडनीसाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये फायबर, फोलेट आणि व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते, जे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात.

health
World Kidney Day 2024: तुमची किडनी खराब होत आहे हे कसं ओळखाल? शरीरातील 'या' बदलांकडे द्या लक्ष...

3. कडधान्ये

डाळींमध्ये खनिजे आणि प्रथिने असतात, जी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. मूग, हरभरा, राजमा यांसारख्या कडधान्यांचे नियमित सेवन केल्याने मूत्रपिंडाची पोटॅशियमची गरज पूर्ण होते आणि ते त्यांचे कार्य योग्य प्रकारे करू शकतात.

4. मशरूम

किडनी निरोगी ठेवण्यासाठी मशरूम खूप महत्वाचे आहेत. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन डी आणि असे मिनरल्स आढळतात, जे किडनीला आजारांपासून दूर ठेवतात.

5. खजूर

किडनीच्या आरोग्यासाठी खजूर खूप फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि इतर पोषक घटक आढळतात, जे किडनीचे कार्य चांगले ठेवतात.

तुमच्या आहारात या सुपरफूड्सचा समावेश करून तुम्ही तुमच्या किडनीच्या आरोग्याचे रक्षण करू शकता. पण तुम्ही आधीच कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.