लेप्रोसी हे कुष्ठरोगाचा एक प्रकार आहे. हा रोग मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जिवाणूमुळे होतो. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जागतीक कुष्ठरोग दिवस साजरा केला जातो. भारतात हा दिवस ३० जानेवारीला साजरा केला जातो. त्याला 'हॅनसेन रोग' असेही म्हणतात. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 'जागतिक कुष्ठरोग दिन' साजरा केला जातो.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, कुष्ठरोगामुळे स्किन अल्सर, मज्जातंतूंचे नुकसान आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास अपंगत्वासह अनेक घातक परिणाम होऊ शकतात. या आजाराची लक्षणे, परिणाम आणि उपचार याबद्दल जाणून घेऊया.
त्वचा असंवेदनशील होणे, न खाजणारे, न दुखणारे चट्टे येणे, जाड, तेलकट त्वचा होणे, नसांमध्ये वेदना होणे ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या जखमा सहजासहजी भरत नाहीत. अशी लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टर 'बायोप्सी' करू शकतात, ज्यामध्ये तुमच्या त्वचेचा एक छोटा तुकडा प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवला जातो. याशिवाय लेप्रोमाइन चाचणीद्वारेही हा गंभीर आजार ओळखता येतो.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार कुष्ठरोगाचे मुख्य सहा प्रकार आहेत. त्यांना इंडिटर्मिनेट लेप्रोसी, ट्यूबरक्लॉइड लेप्रोसी, बॉर्डरलाइन ट्यूबरक्लॉइड लेप्रोसी, बॉर्डरलाइन लेप्रोसी आणि लेप्रोमेशस लेप्रोसी असे म्हणतात. कुष्ठरोग समजून घेतल्यानंतरच डॉक्टर योग्य उपचारांबद्दल सांगू शकतात.
हेल्थलाइननुसार, कुष्ठरोगाचा आजार मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होतो. रूग्णाच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्यामुळे हा आजार वाढत जातो. या आजाराचे संक्रमण हवेतून बॅक्टिरीया पसरून होत असते. खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हा आजार इतरांपर्यंत पोहोचला जातो. जर इतर व्यक्तीच्या श्वासांमार्फत बॅक्टिरीया शरीराच्या आत गेले तर कुष्ठरोगाची लागण होऊ शकते. तर आज आम्ही तुम्हाला कुष्ठरोगाची कारणं लक्षणं आणि उपाय सांगणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.