World Lion Day 2024 : जंगलच्या राजाचा थाट अनुभवायचाय तर 'या' प्रसिद्ध अभयारण्यांना द्या भेट, होईल सिंहाचे दर्शन

Lion National Park : जंगलाचा राजा सिंह त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे. काही दिवसात सिंह सुद्धा लुप्त होईल अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे.
World Lion Day
World Lion Dayesakal
Updated on

World Lion Day :

जगात कितीही राज्य असली तरी त्या प्रत्येक राज्याला राजा शिवाय शोभा नाही. असंच जंगलाचं सुद्धा आहे. जंगल कितीही मोठं आणि घनदाट असलं तरी त्याला त्याचा राजा म्हणजे सिंहाशिवाय शोभा येत नाही. जंगलचा राजा सिंह याचा आज हॅपी बर्थडे आहे. म्हणजेच आज जागतिक सिंह दिवस आहे.

जंगलाचा राजा सिंह त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे. काही दिवसात सिंह सुद्धा लुप्त होईल अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे. त्यामुळेच दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी 'वर्ल्ड लायन डे' (World Lion Day) साजरा केला जातो. या दिवशी काही उपक्रम घेऊन सिहांप्रती जागृती केली जाते.

World Lion Day
Lion Fight : दोन सिंह आपापसात भिडले; सिंहीणी फक्त बघतंच राहिल्या, Video Viral

जंगलात असलेला प्रत्येक प्राणी आपल्या पृथ्वीसाठी महत्त्वाचा आहे. तसाच सिंह सुद्धा महत्त्वाचा आहे. भारतातही काही अशी अभयारण्य आहेत. जी सिहांसाठी प्रसिद्ध आहेत. आज आपण भारतातील प्रसिद्ध 'लायन रिझर्व पार्क' बद्दल जाणून घेऊयात.

गिर नॅशनल पार्क

भारतातील हे असे एक नॅशनल पार्क आहे. जिथे आशियाई सिंह मोठ्या प्रमाणावर आहेत. गिर अभयारण्याची सफारी करताना तुम्हाला थेट सिंहाचे दर्शन होऊ शकते. आणि हा अनुभव एक वेगळी अनुभूती देणारा ठरू शकतो. गिर अभयारण्यात पोहोचण्यासाठी वेरावळ किंवा जुनागड रेल्वे स्टेशन हे पर्याय बेस्ट आहेत. इथून तुम्ही बसने गिर अभयारण्यात पोहोचू शकता.

गिर अभयारण्य
गिर अभयारण्यesakal
World Lion Day
Lonavala : लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट सायंकाळी ६ नंतर बंद;प्रांताधिकाऱ्यांचे आदेश ,पर्यटनस्थळांसाठी नियमावली जाहीर

कूनो वाइल्डलाईफ अभयारण्य

पंतप्रधान मोदींनी भारतातून लुप्त झालेला प्राणी चित्ता पुन्हा भारतात आणल्याने हे अभयारण्य चर्चेत आले होते. या ठिकाणाला आशियाई सिंहाचे घर म्हटले जाते. अनेक एकरात पसरलेलं हे विस्तीर्ण अभयारण्य आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात.

चंद्रप्रभा अभयारण्यातील धबधबा
चंद्रप्रभा अभयारण्यातील धबधबाesakal
World Lion Day
Lioness Named Sita : सिंहाचं नाव अकबर तर सिहिंणीचं सीता! दोघांना एकत्र ठेवण्यावर VHPचा आक्षेप; प्रकरण पोहचलं हायकोर्टात

चंद्रप्रभा नॅशनल अभयारण्य

चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य सिहांसाठी प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये असलेलं हे अभयारण्य सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्याची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली होती. या अभयारण्यात 1958 मध्ये आशियाई सिंहांना आणले गेले होते. पण ते सिंह जंगलातून गायब झाले. त्यानंतर पुन्हा 1993 मध्ये सिंहांना या जंगलात आणण्यात आले.

World Lion Day
Video : पठ्ठ्याने इंग्लिश गोलंदाजांना तुडव तुडव तुडवले! शतक ठोकत मैदानातून सोडला 'बाण', भरतचे जय श्रीराम
सीतामाता अभयारण्यातील वन्यजीव
सीतामाता अभयारण्यातील वन्यजीवesakal

सीतामाता वन्य अभयारण्य

राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यात हे अभयारण्य आहे. राजस्थान सरकारकडून २ नोव्हेंबर 1979 मध्ये या वन्यजीव अभयारण्याची घोषणा करण्यात आली होती. या अभयारण्यात जंगली डुक्कर, बिबट्या, जंगली मांजर, नीलगाय असे अनेक विविध जातीचे प्राणी आढळतात. प्रतापगड मधील एका उंच डोंगरावरती माता सीतेचे एक मंदिर आहे. त्यामुळे श्रद्धाळून इथे भेट देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.