World Mental Health Day : जेवढा प्रवास तेवढे मानसिक आरोग्य राहणार खास! काय आहेत फायदे ? घ्या जाणून

काही तज्ज्ञांच्या मते मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रवास जरूर करायला हवा.
mental health day 2023
mental health day 2023esakal
Updated on

World Mental Health Day 2023 : रोजचे धावपळीचे आयुष्य, व्यस्त शेड्यूल आणि कामाचा ताण यामुळे आपले कामाचे रूटीन हे आपल्याला बोअर वाटू लागते. या बिझी शेड्यूलमुळे आणि कामाच्या सतत ताणामुळे डिप्रेशन येण्याची शक्यता अधिक असते.

अशा परिस्थितीमध्ये मग डॉक्टर ट्रॅव्हल थेरपीचा पर्याय रूग्णांसमोर ठेवतात. रोजच्या बोअरिंग रूटीनमधून बाहेर पडून काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यावर आणि प्रवास केल्यावर आपले मानसिक आरोग्य सुधारते. अनेक तज्ज्ञांच्या मते, प्रवासामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

जगभरात १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) म्हणून साजरा केला जातो. मानसिक आरोग्यासंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा यामागचा मूळ उद्देश आहे. आज आपण जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त प्रवास केल्याने मानसिक आरोग्याला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

प्रवासामुळे मानसिक आरोग्याला होणारे फायदे खालीलप्रमाणे

सकारात्मक विचार

रोजचे कामाचे बोअरिंग रूटीन आणि घर या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपली दमछाक होते. या सगळ्यात आपण स्वत:साठी वेळ काढत नाही, स्वत: ला वेळ देत नाही. त्यामुळे, घरापासून दूर गेल्यावर प्रवासामध्ये, व्हेकेशनवर असताना आपण स्वत:बद्दल सकारात्मक विचार करतो. पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात येतात.

mental health day 2023
World Mental Health Day : मुलांचे मानसिक आरोग्य मजबूत करण्याची गरज, तुमच्या कामी येतील 'या' टिप्स

तणाव-चिंता दूर होते

काही तज्ज्ञांच्या मते तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी प्रवास जरूर करायला हवा. प्रवास केल्यामुळे आपल्या मनात सकारात्मक विचार येतात, आपल्यात एक नवा उत्साह संचारतो.

ज्या काही समस्या आणि चिंता सतावत असतील त्यावर मार्ग काढायचा प्रयत्न आपण करतो. शिवाय, आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला मिळतो.

नैराश्याची पातळी कमी होते

आजकाल लोकांमध्ये नैराश्याची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चिंतेची बाब म्हणजे किशोरवयीन मुले, तरूण, प्रौढ व्यक्ती अशा सर्वांना या समस्येने ग्रासले आहे. नैराश्यामुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरीक आरोग्य धोक्यात येते.

मात्र, प्रवासाला गेल्यामुळे रोजच्या रूटीनमध्ये जरा बदल होतो. त्यामुळे, मनात सकारात्मक विचार येतात. आयुष्याची दिशा बदलण्यास मदत मिळते. निसर्गाचा सहवास, प्रवासात भेटलेली माणसे या सगळ्याचा आयुष्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, आपोआप नैराश्याची पातळी कमी होण्यास मदत होते.

mental health day 2023
Mental Health Tips: तुम्हीही आहात Overthinking चे शिकार? मग हे उपाय करून बघा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.