चांगले आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आपण आपल्या शारीरिक आरोग्याची जितकी काळजी घेतली पाहिजे तितकीच मानसिक आरोग्याचीही आपल्यासाठी गरज आहे. बदलत्या जीवनशैलीत आपल्या कामाच्या लोडचा आपल्या मानसिक आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम झाला आहे.
कामाशी संबंधित ताणतणावाचा आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो. काही वेळा तो इतका गंभीर होतो की त्यामुळे नैराश्यासारख्या आजारांचा धोकाही वाढतो.
हेल्थलाइनच्या बातमीनुसार, आज जवळजवळ प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी मानसिक तणाव किंवा चिंतेचा सामना करावा लागतो. ऑफिसच्या कामामुळे आणि व्यवसायाच्या समस्यांमुळे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर स्ट्रेस घेतात आणि यामुळे थेट आपल्या मानसिक आरोग्याला चालना मिळते.
आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये काही छोटे बदल करून, आपण तणावाला बाय बाय म्हणू शकता आणि आपल्या जीवनात नवीन उर्जेने पुढे जाऊ शकता. मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि कामाचा ताण दूर ठेवण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब करता येईल ते जाणून घेऊया….
जागरुक राहा: तणाव टाळण्यासाठी पहिली महत्त्वाची स्टेप म्हणजे स्वतःला जागृत ठेवणे. हे तुम्हाला थोडे सोपे वाटेल पण खूप अवघड आहे. तुम्हाला कोणत्या परिस्थितीत तणाव जाणवतो हे समजून घेतले पाहिजे जेणेकरून तुम्ही त्यांच्यापासून दूर राहू शकता.
काहीवेळा तणावाखाली राहूनही तुम्हाला हे समजू शकत नाही की तुम्ही तणावग्रस्त आहात, हेही समजून घेणे गरजेचे आहे. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते.
जर तुम्हाला लवकर थकवा जाणवत असेल, डोकेदुखी, निद्रानाश, हृदयाचे ठोके जलद होणे, घाम येणे आणि तुम्ही सतत आजारी पडत असाल तर ही मानसिक तणावाची लक्षणे असू शकतात.
स्वतःला बूस्टअप करण्यासाठी वेळ काढा: जेव्हा आपण एकाच ठिकाणी अनेक तास काम करत असतो, तेव्हा तणाव जाणवणे सामान्य गोष्ट आहे. तणाव टाळण्यासाठी, तुमच्या व्यस्त जीवनात तुम्ही स्वत:साठी थोडा वेळ काढणे फार महत्वाचे आहे. लहान ब्रेक दरम्यान, तुम्ही मित्रांशी बोलू शकता आणि सोशल मीडियाचा आनंद घेऊ शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला पुन्हा ऊर्जा देण्यास मदत करतील.
वैयक्तिक आयुष्य : अनेकदा लोक त्यांचे व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक आयुष्य मिक्स करतात आणि त्यामुळे चिंता वाढते. तुम्हाला तुमचे काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये काही सीमा निश्चित कराव्या लागतील.
नकारात्मक विचार टाळा: आपण जे विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडते. तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील तर त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो. अनेकदा तुमची नकारात्मक विचारसरणी तुमच्या परिणामांवर परिणाम करते ज्यामुळे तुम्ही मानसिकरित्या अस्वस्थ होऊ शकता. त्यामुळे तुमची नकारात्मक विचारसरणी बदलणे महत्त्वाचे आहे.
सुट्टीवर जा: या व्यस्त जीवनात लोक स्वतःसाठी वेळ काढणे विसरले आहेत. लोक ऑफिसच्या कामात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त झाले आहेत की ते स्वतःचा विचार करणे विसरले आहेत आणि यामुळे आपल्या शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
तुम्ही अनेक महिन्यांपासून सुट्टी घेतली नसेल, तर दर 2-3 महिन्यांनी सुट्टी घेऊन मित्र किंवा कुटुंबासोबत ट्रिपला जाणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.