World Mental Health Day : मुलांचे मानसिक आरोग्य मजबूत करण्याची गरज, तुमच्या कामी येतील 'या' टिप्स

लहान मुलांचे मानसिक आरोग्य जपणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
World Mental Health Day : मुलांचे मानसिक आरोग्य मजबूत करण्याची गरज, तुमच्या कामी येतील 'या' टिप्स
Updated on

World Mental Health Day 2023 : जगभरात दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) साजरा केला जातो. हा दिवस १० ऑक्टोबरला साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

मागील काही वर्षांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आजकाल सर्वांचे आयुष्य हे धावपळीचे झाले आहे. त्यामुळे ताण-तणावाच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे, मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मानसिक आरोग्याबाबत जेव्हा विचार केला जातो, तेव्हा तो मोठ्या गटातील लोकांबद्दल केला जातो. परंतु, लहान मुलांचे मानसिक आरोग्य जपणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. मोठ्या लोकांच्या तुलनेत लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर ही गांभीर्याने लक्ष देणे हे देखील आवश्यक आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही लहान मुलांचे मानसिक आरोग्य चांगल्या प्रकारे मजबूत करू शकता.

मुलांना रिलॅक्स व्हायला शिकवा

मुलांना रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीज करू शकता. जसे की, त्यांना चित्रे काढायला लावा. चित्रे रंगवायला सांगा. त्यांच्या आवडीच्या गाण्यांवर डान्स करायला लावा, यातून त्यांना आनंद ही मिळेल आणि त्यांना रिलॅक्स व्हायला मदत होईल.

मुलांसोबत रोज व्यायाम केल्याने आरोग्य ही चांगले राहील आणि मुलांना रिलॅक्स व्हायला मदत मिळेल. या सर्व गोष्टी करून तुम्ही त्यांना रिलॅक्स व्हायला शिकवू शकता.

World Mental Health Day : मुलांचे मानसिक आरोग्य मजबूत करण्याची गरज, तुमच्या कामी येतील 'या' टिप्स
Parenting Tips : घरातून काम करताना मुलांची देखभाल करण्यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स

घरातील वातावरण महत्वाचे

घरातील वातावरण हेल्दी आणि प्रसन्न असणे हे सर्वांसाठी आणि विशेष करून लहान मुलांसाठी अतिशय महत्वाचे आहे. घरातील वातावरणात जर सतत ताण, टेंन्शन, भांडणे होत असतील तर मग मुलांना अशा वातावरणात रहायला भीती वाटू शकते.

या सगळ्याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, पालकांची मुलांसोबत हेल्दी रिलेशनशिप असणे महत्वाचे आहे. त्यासोबतच, घरातील वातावरण हेल्दी असणे महत्वाचे आहे.

स्ट्रेससोबत डील करायला शिकवा

अनेकदा मुलांना अभ्यास आणि परीक्षांचा ताण येतो. रोजच्या अधिकच्या होमवर्कमुळे देखील मुलांवर ताण येण्याची शक्यता असते. अशावेळी या स्ट्रेससोबत मुलांना डील करायला शिकवा. त्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे.

मुलांना नेमका कशाचा ताण येतोय? या संदर्भात त्यांच्याशी बोला,चर्चा करा. या समस्येवर मार्ग काढायला शिकवा. अभ्यास करताना थोडा ब्रेक म्हणून अर्धा तास त्यांना खेळायला सांगा किंवा त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट त्यांना करायला सांगा. जेणेकरून त्यांना त्यातून आराम मिळू शकेल.

World Mental Health Day : मुलांचे मानसिक आरोग्य मजबूत करण्याची गरज, तुमच्या कामी येतील 'या' टिप्स
Parents Teacher Meeting : ‘पॅरेंट्स टीचर मिटिंग’ मध्ये मुलांसमोर बोलताना पालकांनी काय काळजी घ्यावी ? जाणून घ्या ‘या’ गोष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.