World Milk Day 2024 : आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या दुधापासून घरच्या घरी बनवा 'हे' चवदार पदार्थ

World Milk Day 2024 : आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात दूध अतिशय महत्वाची भूमिका बजावते.
World Milk Day 2024
World Milk Day 2024esakal
Updated on

World Milk Day 2024 : आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात दूध अतिशय महत्वाची भूमिका बजावते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण दूधाचे सेवन करतात. दूधाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. आपल्या रोजच्या आहारात दुधाचा प्रामुख्याने समावेश केला जातो. दूध हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

जगभरात दरवर्षी १ जून रोजी 'जागतिक दूध दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने या दिवसाची सुरूवात केली होती, तेव्हापासून आजतागायत ही परंपरा आजही सुरू आहे. या जागतिक दूध दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला दुधापासून बनवल्या जाणाऱ्या खास पदार्थांबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ तुम्ही घरच्या घरी सहजपणे बनवू शकता. कोणते आहेत हे पदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

World Milk Day 2024
Carrot-Beetroot Recipies : गाजर आणि बीटापासून बनवा 'या' सोप्या रेसिपीज, रहाल तंदुरूस्त

खीर

प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे खीर होय. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना खीर खायला आवडते. दुधाचा वापर करून अनेक प्रकारच्या खीर बनवल्या जातात. तांदळाची, शेवयांची अशा नाना प्रकारच्या खीर बनवल्या जातात. खीर ही एक स्वादिष्ट रेसिपी आहे. ज्या लोकांना गोड खायला आवडते, त्यांच्यासाठी हा पटकन होणारा एक उत्तम पर्याय आहे

मिल्क शेक

कित्येक लहान मुलांची आणि मोठ्यांची सकाळ ही मिल्क शेकने होते. लहान मुलांना तर मिल्क शेक प्यायला प्रचंड आवडतो. जर तुमच्या मुलांना साधे दूध प्यायला आवडत नसेल तर, तुम्ही त्यांना मिल्क शेक बनवून त्यांना ते प्यायला लावू शकता.

मिल्क केक

दुधाचा वापर करून अनेक प्रकारच्या मिठाई आणि गोड पदार्थ खास करून बनवले जातात. यामध्ये मिल्क केकचा ही समावेश आहे. तुम्ही दुधाचा वापर करून स्वादिष्ट असा मिल्क केक देखील बनवू शकता. जागतिक दूध दिनानिमित्त तुम्ही  घरच्या घरी झटपट मिल्क केक नक्कीच बनवू शकता.

कुल्फी

सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात थंड पदार्थ आणि पेयांचा आस्वाद घ्यायला सगळ्यांनाच आवडते. दुधापासून तुम्ही विविध प्रकारच्या आईसक्रीम आणि कुल्फी देखील बनवू शकता.

World Milk Day 2024
Cucumber Recipies : हेल्दी अन् टेस्टी.! कडक उन्हाळ्यात शरीराला गारवा देणाऱ्या काकडीच्या सोप्या रेसिपीज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.