World Nature Conservation Day 2024 : निसर्गाला जपा, तो ही तुम्हाला जपेल..! जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त 'या' गोष्टी जरूर करा

World Nature Conservation Day 2024 : आज जगभरात ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन’ साजरा केला जात आहे.
World Nature Conservation Day 2024
World Nature Conservation Day 2024esakal
Updated on

World Nature Conservation Day 2024 : आज जगभरात मोठ्या उत्साहात ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन’ साजरा केला जात आहे. आपल्या सभोवतालचा निसर्ग, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि निसर्गाच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २८ जुलैला हा दिवस साजरा केला जातो. पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यात निसर्ग महत्वाची भूमिका बजावतो.

निसर्गामुळेच आपल्याला अन्न, पाणी, हवा आणि निवारा मिळतो. इतकेच नाही तर निसर्गामुळेच हवामान अनुकूल राहण्यास मदत होते. हवामानातील बदल, प्रदूषण, जंगलतोड इत्यादी अनेक नैसर्गिक आपत्तींपासून आपण सुरक्षित राहतो. अशा परिस्थितीमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आपण आपल्या आसपासच्या निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

World Nature Conservation Day 2024
Save Water Save Nature : पर्यावरणप्रेमींचा मोटारीने २० देशांचा प्रवास; ७० दिवसांत केले १९ हजार किलोमीटरचे अंतर पार

पाणी वाचवा

पाणी हे नैसर्गिक संसाधनांपैकी एक आहे. पाण्याला अमृत आणि जीवन म्हटले जाते. परंतु, आज हे पाणी दुर्मिळ होत चालले आहे. जगातील अनेक भागांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे, पाण्याची काळजी घेणे आणि पाणी वाचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

पाणी वाचवण्यासाठी आपण छोट्या-मोठ्या गोष्टी करू शकतो. त्यासाठी पाण्याचा वापर कमी प्रमाणात करणे, गरज असेल तिथेच वापर करणे, झाडे लावणे, पाण्याचे संरक्षण करणे, पाणीसाठे जिवंत करणे इत्यादी गोष्टी करून पाण्याचा बचाव करू शकतो

टिकाऊ-उत्पादनांचा करा वापर

प्लॅस्टिक हा निसर्गाचा सर्वात मोठा क्षत्रू आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण, प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यामुळे, उत्पादने खरेदी करताना ती शक्यतो दीर्घकाळ टिकणारी आणि पर्यावरणपूरक असावीत. ज्यामुळे, पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही.

पुनर्वापर करण्यावर भर द्या

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून पुनर्वापर करण्यावर भर द्यायला हवा. जेणेकरून नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय आपल्याला टाळता येऊ शकेल. कागद, प्लॅस्टिक, धातू, काच इत्यादी गोष्टींचा पुनर्वापर करून आपण निसर्गाचे संवर्धन करू शकतो. त्यामुळे, आपण आपल्या दैनंदिन जीवनात पुनर्वापर केलेल्या उत्पादनांचा अवलंब करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.