पूर्वी फार व्हरायटी आणि सर्वांनाच परवडेल अशा किंमतीत साड्या नसल्याने नवरीला एकाच प्रकारच्या साड्या घेतल्या जायच्या. पण, आता लग्नसराईत सर्वात जास्त खरेदी ही नवरीची होते. नवरीला वेगवेगळ्या विधी करताना वेगवेगळ्या पाच सहा साड्या घ्याव्या लागतात. त्यातही रिसेप्शनला, सप्तपदीला, मंगलअष्टकांना वेगवेगळ्या साड्या घ्याव्या लागतात.(World Saree Day 2022)
अशावेळी कोणकोणत्या साड्या निवडाव्यात याचा गोंधळ होतो. मैत्रीणीने जी साडी घेतली तशीच हवी, किंवा एखाद्या फेवरेट अभिनेत्रीचा लुक कॉपी केला जातो. त्यामूळेच आज साडी डेच्या निमित्ताने नवरीसाठी कोणकोणते ऑप्शन आहेत हे पाहुयात.
पैठणी
महाराष्ट्रीयन लग्न सोहळा पैठणी शिवाय अपूर्ण आहे. पैठणी खरेदीला येवलाला जाऊन पैठणी खरेदी करून आणण्यापासून लग्नघराची तयारी असते. पैठणीमध्ये जरतारी पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी असे अनेक प्रकार आहेत.
शालू
लग्नासाठी भरजरी शालू हवा, असा प्रेमळ हट्ट प्रत्य़ेक मुलगी आईकडे करत असते. कारण, लग्नात उंची वस्त्र म्हणून शालूला पहिली पसंती आहे. पूर्वीच्या काळापासून शालूचे अस्तित्व टिकून आहे. त्यावर असलेले हेवी वर्क आणि फिरती रंगसंगती त्यामूळे शालू आजही नवरी मुलीच्या मनात राज्य करतो.
बनारसी साडी
तुम्हाला काही वेगळे हवे असेल तर तुमच्यासाठी पारंपरिक भारतीय साडी म्हणून बनारसी साडी हा उत्तम पर्याय आहे. कधीही भारतीय साडी म्हटली की बनारसी साडी नक्कीच डोळ्यासमोर येते. अगदी पूर्वीपासून लग्नात बनारसी शालू नेसले जायचे. पण बनारसी शालू जड असल्यामुळे नंतर कालांतराने डिझाईनर साड्यांची मागणी वाढली.
चंदेरी
चंदेरी ही मूळची ग्वाल्हेरजवळील चंदेरी गावची असली तरी महाराष्ट्रातही ही साडी तयार होते. या साडीचा किनारा आणि बुट्ट्यांमध्येच त्याचे वैशिष्ट्य आहे. उन्हाळ्यात नेसायला अतिशय सोपी आणि सुंदर साडी असल्याने उन्हाळी सुट्टीत लग्नाचा बार उडवणाऱ्या नववधू चंदेरी साडीला पसंती देतात.
खण साडी
आता अगदी वेगवेगळ्या साड्यांची फॅशन आली आहे. पण आजही महाराष्ट्रीयन खणाची साडी ही सगळ्यात अप्रतिम ठरते.आजकाल सर्रास या साड्या , खण ड्रेस बाजारात उपलद्ध आहेत. याबरोबर तुम्ही ऑक्सिडाईज्ड दागिने घातले की वेगळाच साज चढतो.
नऊवारी
आजकाल सर्रास सगळ्या वधू नऊवारी नेसतात. काही रेडीमेड नऊवारी घेतात. तर, काहीजणी नऊवारी शिवून घेतात. लग्नात वधू सप्तपदीसाठी नऊवारी नेसतात. नऊवारीचा हा ट्रेंड सध्याच्या लग्नसराईत हिट ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.