World Social Justice Day 2024 : जागतिक सामाजिक न्याय दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

जगभराज आज 'जागतिक सामाजिक न्याय दिन' साजरा केला जात आहे. दरवर्षी २० फेब्रुवारीला हा दिवस मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो.
World Social Justice Day 2024
World Social Justice Day 2024esakal
Updated on

World Social Justice Day 2024 : जगभराज आज 'जागतिक सामाजिक न्याय दिन' साजरा केला जात आहे. दरवर्षी २० फेब्रुवारीला हा दिवस मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. २००९ मध्ये पहिल्यांदा हा दिवस जगभरात साजरा करण्यात आला होता. लोकांनी कोणताही भेदभाव आणि असमानता न ठेवता व्यक्तीला किंवा एकमेकांना समान अधिकार देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

यासोबतच लोकांना सामाजिक न्याय आणि समतेची जाणीव करून देणे हा देखील हा दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे, या सगळ्याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी २० फेब्रुवारीला हा दिवस जगभरात साजरा केला जातो. आज आपण या जागितक सामाजिक दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्व जाणून घेणार आहोत.

जागतिक सामाजिक न्याय दिनाचा इतिहास काय?

संयुक्त राष्ट्रांनी २००७ मध्ये एक ठराव मंजूर केला होता. त्या ठरावाप्रमाणे दरवर्षी २० फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा करण्याची घोषणा देखील करण्यात आली. ही घोषणा झाल्यानंतर तब्बल २ वर्षांनंतर २००९ मध्ये पहिल्यांदाच जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.

जागतिक सामाजिक न्याय दिन यशस्वीपणे साजरा करण्यासाठी अनेक देश एकत्र येतात. एकत्र येऊन जातीभेद, लिंगभेद, बेरोजगारी, गरिबी आणि धर्माच्या नावाखाली विभागलेल्या लोकांना एकत्रितपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात. भारतात लोकांना समान अधिकार देण्याचा कायदा आहे. यासाठी भारतीय राज्यघटनेत सामाजिक विषमता दूर करण्यासाठी अनेक तरतूदींचा समावेश करण्यात आला आहे.

जागतिक सामाजिक न्याय दिनाचे महत्व काय?

सध्याच्या आधुनिक काळात जागतिक सामाजिक न्याय दिनाचे महत्व अधिक वाढले आहे. आपण सर्वजण एक आहोत आणि आपल्यातील भेदभाव किंवा कोणतीही विषमता दूर करण्यासाठी समाजात जागृती निर्माण करणे महत्वाचे आहे. तसेच, या गोष्टी होता कामा नयेत, यासाठी आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

भारत देशातील सरकार अनेक योजना राबवत आहे. या अंतर्गत जनतेला समान अधिकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेणेकरून सर्व समाजाचा एकत्रितपणे विकास होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.