Soil Benefits for Hair Nutrition : सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये नैसर्गिक गोष्टींना आजही विशेष महत्व आहे. यात त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी माती उपयुक्त ठरतं असं सौंदर्य तज्ज्ञांचं मत आहे. त्यांमुळे मातीचे फेस पॅक, मातीने आंघोळ करण्याचे फायदे आहेत तसेच केसही मातीने धुण्याचे आनेक फायदे आहेत.
बाजारातल्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिकरित्या उपलब्ध गोष्टी खूप प्रभावी काम करतात. केसांना माती लावून केस धुतल्यास शाम्पूपेक्षाही चांगले परिणाम दिसून येतात. अर्थात केसांना लावण्याची माती ही विशिष्ट माती असते.
केसांची निगा राखण्यासाठी महागडी उत्पादनंच हवी हा केवळ एक गैरसमज आहे. दर्जेदार ब्रॅण्डचे शाम्पू वापरुनही शाम्पू बदलावे वाटतात. चांगल्या शाम्पूचा शोध सुरुच राहातो. केस चांगले राहाण्यासाठी केस नीट धुतले जाणं, टाळू स्वच्छ होणं खूप गरजेचं असतं.
कोणती माती वापरावी?
आजही ग्रामीण भागातील अनेक महिला केस धुण्यासाठी मातीचा उपयोग करतात. गावात केसांसाठीची शुध्द स्वरुपातली माती उपलब्ध असते. शहरी भागात ही सोय नाही. पण दुकानांमधे केस धुण्यासाठीची माती मिळते. केस धुण्यासाठी तीन प्रकारच्या मातीचा उपयोग होतो. रहसॉल/गहसॉल, बेण्टोनाइट आणि काओलिन या तीन प्रकारच्या मातीचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. तसेच या तीन मातींचा उपयोग हेअर मास्क म्हणून केला तर केस छान होतात.
मातीने केस धुण्याचे फायदे
1. शाम्पूनं केस धुतल्यानं केस आणि टाळू दोन्ही स्वच्छ होतात. पण शाम्पूमधील रासायनिक घटकांमुळे केसांच्या मुळांचं अर्थात टाळूचं नुकसान होतं. पण केस धुण्यासाठी वरील तीनपैकी कोणतीही माती वापरली तरी केस आणि टाळूचं कोणतंही नुकसान न करता केस स्वच्छ होतात. माती केसातील, टाळूतील घाण आणि विषारी घटक स्वत:कडे खेचून घेते. आणि माती लावून जेव्हा पाण्यानं केस धुतले जातात तेव्हा केस आणि टाळू व्यवस्थित स्वच्छ होतात. तेल लावल्यानं तेलकट झालेले, घामानं चिकट झालेले केस मातीच्या उपयोगानं छान सुळसुळीत होतात.
2. माती हा नैसर्गिक घटक आहे. मातीत अनेक खनिजं आणि पोषक तत्त्वं असतात. यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं. केस निरोगी असतील तरच केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. केसांची चमक वाढते. शाम्पू लावून केस कोरडे आणि राठ होतात. केसांना असा शुष्कपणा माती लावून केस धुतल्यास येत नाही. याउलट मातीनं केस धुतल्यास केस मऊ होतात.
3. केसांचा नैसर्गिक पीएच स्तर राखला गेला तरच केसांचं आरोग्य चांगलं राहातं. शाम्पूच्या वापरानं केसांचा पीएच स्तर खाली घसरतो. पण केसांना माती लावली तर मात्र केसांमधील पीएच स्तर टिकून राहातो आणि त्याचं प्रमाणही योग्य राहातं. केसांचं आरोग्य नीट राहाण्यासाठी केसांचा पीएच स्तर 4.5 असणं आवश्यक आहे.
पीएच केसांचं जीवाणू आणि बुरशीपासून रक्षण करतं. मातीमुळे केसातील अतिरिक्त तेल सहज निघून जातं. पण केसातील नैसर्गिक तेल आणि आद्रता मात्र केसात टिकून राहाते. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. केस गळतीची समस्या सुटते.
केसांना माती लावताना ही काळजी घ्या
कोणतंही उत्पादन ते नैसर्गिक असो की रासायनिक, ते वापरताना आपल्याला सूट होतंय ना याची आधी खात्री करुन घ्यायला हवी. बाजारात मिळणारी माती केसांसाठी वापरताना आधी मातीची पेस्ट हाताच्या मनगटाला लावून पाहावी. जर अॅलर्जी सदृश्य परिणाम दिसले नाहीत तर मग माती केसांना लावावी. आपल्या केसांसाठी कोणत्या प्रकारची माती उपयुक्त आहे याबाबत सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.