World Tourism Day 2023 : 'जागतिक पर्यटन दिन' का साजरा केला जातो? काय आहे इतिहास?

जागतिक पर्यटन दिनाचे महत्व हे अनेक बाजूंनी अधोरेखित होते.
World Tourism Day 2023
World Tourism Day 2023esakal
Updated on

World Tourism Day : फिरायला जायला कुणाला आवडत नाही ? कोणतही ठिकाण असो आपण बॅग भरून फिरायला बाहेर पडतो. मग ती वन डे पिकनिक असो किंवा ८-१० दिवसांची ट्रीप असो. अनेकदा आपण निसर्गाच्या सानिध्यात किंवा एखाद्या शहरात, देशात, परदेशात आणि पर्यटन स्थळी आवर्जून भेट देतो. त्यामुळे, पर्यटन करणे हा आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

आज २७ सप्टेंबर अर्थात ‘जागतिक पर्यटन दिन’ आहे. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे विशेष योगदान असते. देश-विदेशातून येणारे लाखो पर्यटक वाहतुकीपासून ते हॉटेल्स, शॉपिंग आणि पर्यटन स्थळांच्या तिकिटांपर्यंत अशा कित्येक गोष्टींवर पैसे खर्च करतात. यामुळे देशाच्या महसूलामध्ये वाढ होते.

पर्यटन स्थळांमध्ये नवनवीन ठिकाणांची भर पडताना आपण पाहतो. ज्यांना फिरण्याची आवड आहे, असे लोक नवनवीन पर्यटन स्थळांचा शोध घेताना दिसतात. त्यामुळे, या ठिकाणांमध्ये दरवर्षी वाढ होताना दिसते.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या या खास दिवसाचे महत्व काय ? आणि हा दिवस निवडण्या मागचा इतिहास काय ? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

World Tourism Day 2023
Travel Packing Tips : लाँग वीकेंडचा प्लॅन असेल तर इतरांपेक्षा या पॅकिंग टिप्स तुमची जास्त मदत करतील

जागतिक पर्यटन दिनाचे महत्व काय ?

जागतिक पर्यटन दिनाचे महत्व हे अनेक बाजूंनी अधोरेखित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाची भावना लोकांमध्ये जागृत करणे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे. पर्यटन करणे म्हणजे काय तर एखाद्या स्थळाचा इतिहास, तिथली संस्कृती, खाद्यपरंपरा याचा मागोवा घेणे होयं.

एकप्रकारे जगभरातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकिय मूल्यांबद्दल लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करणे हा देखील या दिवसाचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) हे या सगळ्यात महत्वाची भूमिका निभावते, जेणेकरून ते या सगळ्यात सदस्य राष्ट्राला आर्थिक विकासात मदत करू शकतील.

पर्यटन दिनाचा इतिहास काय ?

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने (UNWTO) १९७० मध्ये स्पेनमधील तिसऱ्या सत्रामध्ये हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सर्वात आधी घेण्यात आला होता. त्यानंतर, संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेने (UNWTO) सप्टेंबर १९७९ च्या अखेरीस जागतिक पर्यटन दिन सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर, हा दिवस पहिल्यांदा २७ सप्टेंबर १९८० मध्ये खऱ्या अर्थाने साजरा करण्यात आला होता. खरं तर तेव्हापासून २७ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा दिवस दरवर्षी विविध थीमसह पूर्ण उत्साहात साजरा केला जातो.

World Tourism Day 2023
Travel Destinations in Budget: ऑक्टोबर महिना फिरण्याचा; पण कमी खर्चात जायचं कुठे? उत्तर इथे वाचा...

पर्यटन दिनाची थीम काय ?

जागतिक पर्यटन संघटना ही जागतिक पर्यटनाला चालना देण्याचे महत्वपूर्ण काम करते. दरवर्षी ही संघटना विविध उपक्रम आणि थीम राबवते. त्या आधारे हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

या वर्षी Tourism and Green Investments ही थीम ठेवण्यात आली आहे. दरवर्षी प्रत्येक देश या दिवसाचे प्रतिनिधी म्हणून काम करतो. या वर्षी ही जबाबदारी सौदी अरेबिया या देशाकडे सोपवण्यात आली आहे.

World Tourism Day 2023
Travel Tips: ...तरच ट्रिप होईल बेस्ट; ट्रिप प्लॅन करण्याआधी या गोष्टींचा विचार करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.