महिलांना ‘स्वयंसिद्ध’ बनवण्यासाठी...

स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाची सुरुवात अमरावतीत झाली असली, तरी आता ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरले आहे.
swayansiddha Entrepreneurship Development Campaign
swayansiddha Entrepreneurship Development Campaignsakal
Updated on

- मोनिका उमक, संयोजिका, स्वयंसिद्ध उद्योजकता अभियान

किरण पातुरकर यांच्या ‘रोजगार मागणारे होण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा’ या संकल्पनेतून आमच्या स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली. साधारण सहा वर्षांपूर्वी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एमआयडीसी असोसिएशनद्वारा आयोजित महिलांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाची संकल्पना प्रत्यक्षात आली.

नवा उद्योग उभारण्याची अनिवार इच्छा असलेल्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. त्याच दिवशी प्रेक्षक वर्गातील सातशे जणांनी माहितीपत्रे भरून स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी पाऊल उचलले. त्यातील दोनशे जणांनी यशस्वीरीत्या आपले उद्योग उभारले. विशेषतः अनेक महिलांनी उद्योजक बनण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली.

स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाची सुरुवात अमरावतीत झाली असली, तरी आता ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरले आहे. पुणे, मुंबई, बीड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून हजारो उद्योजक तयार झाले आहेत.

स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान मुख्यतः पाच क्षेत्रांत काम करते. प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणे, योग्य मार्गदर्शन करणे, बँकेत लोन केस करून देणे, जॉब वर्क करून देणे, मोठमोठ्या मॉलमध्ये विक्री करण्यासाठी मदत करून देणे अशा अनेक गोष्टी आमच्या संस्थेतर्फे केल्या जातात. अनेक महिला उद्योजक आमच्या संस्थेच्या माध्यमातून घडल्या, याचा आम्हाला आनंद वाटतो.

काहींनी घरातून छोट्या छोट्या स्तरावरती उद्योग सुरू केले होते, त्यांचा आता विस्तार झाला आहे. काहींना आता त्यांना घरी गृहउद्योग करणे कठीण झाले आहे, म्हणूनच आपण आता सरकारकडून महिला उद्योगांसाठी एमआयडीसी स्पेशल झोनची मागणी करत आहोत. स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानामार्फत मिशन आयटी पार्क असे एक नवीन अभियानही सुरू केले आहे. महिलांसाठी नवीन प्लॉट क्लस्टरसुद्धा करण्याचा मानस आहे.

भविष्यामध्ये अजूनही मोठमोठे प्रोजेक्ट ‘स्वयंसिद्ध’च्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले असले, तरी महिला जोपर्यंत आर्थिक दृष्टिकोनातून जोपर्यंत सक्षम होत नाहीत, तोपर्यंत त्या खऱ्या अर्थाने सक्षम बनणार नाहीत.

आर्थिक दृष्टिकोनातून दुसऱ्या कोणालाही प्रयत्न करून चालणार नाहीत, त्या महिलेला स्वतःच प्रयत्न करावे लागतील आणि तेही गंभीर आणि सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय ती कधीच आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होत नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे. त्याच दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत.

महिलांमध्ये उद्यमशीलता रुजवण्यासाठी इतकी वर्षे प्रामाणिकपणे, तळमळीने काम केल्यानं अनेक जणी उद्योजकतेकडे वळत आहेत, याचा आनंद आहे. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता कमी असल्याचं वास्तव मला अनेक ठिकाणी जाणवतं. त्याबाबतही आमची संस्था काम करत आहे आणि तेही काम हळूहळू पोचत आहे, याचा आनंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.