Worst-Rated Street Foods : भारतात दही पुरी, पापडी चाट अन्... या पदार्थांना अत्यंत वाईट रेटिंग! वाचा पूर्ण यादी

TasteAtlasने काही भारतीय खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे ज्यांना अत्यंत वाईट रेटिंग देण्यात आली आहे
Worst-Rated Street Foods
Worst-Rated Street Foodsesakal
Updated on

Worst-Rated Street Foods : दही पुरी, पापडी चाट यांसारख्या स्ट्रीट फूड्सचे स्टॉल बघून दुरूनच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र TasteAtlasने काही भारतीय खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे ज्यांना अत्यंत वाईट रेटिंग देण्यात आली आहे. TasteAtlas हे पारंपारिक खाद्यपदार्थांवर लेख लिहिणारी एक प्रायोगिक प्रवासी ऑनलाइन मार्गदर्शिका आहे जे अस्सल पाककृती, खाद्य पदार्थांचे निरीक्षण आणि संशोधन यावर लेख लिहिते.

आश्चर्यांची गोष्टी म्हणजे TasteAtlas च्या यादीत महाराष्ट्रातील फेमस स्ट्रीट डिश दही पुरी अगदी टॉपला आहे. तुम्ही दही पुरी प्रेमी असाल तर कदाचित यावर तुमचा विश्वासही बसणार नाही, पण हे खरंय. जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

Worst-Rated Street Foods
Mumbai Street Food: मिठीबाईच्या खाऊगल्लीची सफर अन् ६५ प्रकारचे डोसे

या खाद्यपदार्थांना देण्यात आलेली रँकिंग 17 ऑगस्टपर्यंत नोंदवलेल्या 2,508 रेटिंगवर आधारित होती, यातील 1,773 टेस्ट अॅटलसने वैध मानली होती. बेसन आणि मसाल्यांनी बनवलेला मध्य प्रदेशातील शेव हा मसालेदार नाश्ता दुसऱ्या क्रमांकावर होता, त्यानंतर गुजरातच्या दाबेलीचा क्रमांक लागतो. (Street Food)

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉम्बे सँडविच या मुंबईतील आयकॉनिक डिशलाही या यादीत स्थान मिळाले आहे. अंडी भुर्जीचा क्रमांक पाचवा, तर दही वड्याचा सहावा आणि साबुदाणा वड्याचा सातवा क्रमांक होता. यांसारख्या इतर पदार्थांनाही टॉप 10 "सर्वात वाईट-रेट केलेले भारतीय स्ट्रीट फूड" च्या यादीत समाविष्ट करण्यात आलं.

Worst-Rated Street Foods
Street Food Trend In 2022 : काठी रोल ते कच्छी दाबेली; देशभरात धुमाकूळ घालणारे स्ट्रीट फुड्स

पंजाबचा गोबी पराठा नववा, तर दक्षिण भारतातील बोंडा किंवा बटाटा बोंडा शेवटच्या स्थानावर आहे. ही यादी फूड लव्हर्सना चकीत करणारी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.