Year Ender 2023: केवळ हार्ट अटॅकच नाही, तर गेल्या वर्षभरात हृदयाच्या 'या' समस्यांमुळेही लोकांनी गमावले जीव

गेल्या वर्षभरात हृदयाच्या 'या' समस्यांमुळेही लोकांनी गमावले जीव.
Year Ender 2023: केवळ हार्ट अटॅकच नाही, तर गेल्या वर्षभरात हृदयाच्या 'या' समस्यांमुळेही लोकांनी गमावले जीव
Updated on

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग जागतिक स्तरावर एक गंभीर आरोग्य समस्या म्हणून उदयास येत आहेत. काही दशकांपूर्वीपर्यंत, हृदयविकार ही वृद्धत्वाशी निगडीत समस्या मानली जात होती, मात्र, आता तरूण लोकही त्याचे बळी ठरत आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच हृदयाच्या समस्यांचे निदान होत आहे.

2023 मधील हृदयाच्या समस्यांवर एक नजर टाकली तर आपल्याला असे दिसून येईल की, केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये गेल्या काही वर्षांत, विशेषत: कोरोना महामारीनंतर हृदयाच्या समस्या अधिक नोंदल्या जात आहेत.

या वर्षाचे अवघे काही दिवस शिल्लक आहेत, लवकरच आपण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हृदयाच्या आरोग्यासमोरील आव्हाने अद्याप कमी झालेली नाहीत, 2024 मध्ये त्यावर नियंत्रण मिळवता येईल, यासाठी आपण सर्वांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

केवळ हृदयविकाराचा झटकाच नाही तर हृदयविकाराच्या अनेक समस्यांनी या वर्षभरात सर्वांनाच हैराण केले आहे. त्यावर एक नजर टाकूया आणि त्यातून जाणून घेऊया आणि पुढील वर्षभरात हृदय निरोगी ठेवण्याचे महत्त्वाचे उपाय जाणून घेऊया.

Year Ender 2023: केवळ हार्ट अटॅकच नाही, तर गेल्या वर्षभरात हृदयाच्या 'या' समस्यांमुळेही लोकांनी गमावले जीव
Heart Attack Risk: लहान वयातही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, यामागे नेमकं कारण काय?

हार्ट अटॅक

तुम्ही देखील 2023 मध्ये हृदयविकाराच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मोठ्या संख्येने लोक त्याचे बळी ठरले. जानेवारीच्या सुरुवातीस, देशात सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाबमध्ये जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनलाही हृदयविकाराचा झटका आला होता. ज्याबद्दल तिने मार्चमध्ये मीडियाला सांगितले होते.

देशभरात यावर्षीची हृदयविकाराच्या झटक्याची नोंद केली जाते. गुजरात राज्याचे शिक्षण मंत्री कुबेर दिंडोर यांनी एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यात राज्यात हृदयविकाराच्या झटक्याने एकूण 1,052 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 80 टक्के मृत लोक 11-25 वयोगटातील होते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2022 मध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये 12.5% ​​ची आश्चर्यकारक वाढ झाली होती, ही गती 2023 मध्येही कायम राहिली.

कार्डियक अरेस्ट

हृदयविकाराच्या झटक्याबरोबरच हृदयविकाराशी संबंधित इतर समस्यांनी देखील लोकांना खूप त्रास दिला, कार्डियक अरेस्ट देखील त्यापैकी एक होता. ऑगस्ट महिन्यात पेपरफ्राय कंपनीचे सह-संस्थापक अंबरिश मूर्ती यांचे लेहमध्ये कार्डियक अरेस्टने निधन झाले, ते 44 वर्षांचे होते.

त्याचप्रमाणे, 33 वर्षीय ब्राझिलियन इंफ्लुएंसर लॅरिसा बोर्जेस यांचे डबल कार्डियक अरेस्टने मृत्यू झाल्याच्या बातमीने लोकांना धक्का बसला.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट या दोन्ही हृदयाच्या समस्या आहेत. हार्ट अटॅक हा कोरोनरी धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे उद्भवणारी समस्या आहे.

एन्युरिझम

हृदयविकाराच्या समस्यांबद्दल बोलायचे झाले तर, हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट याविषयी चर्चा केली जाते, परंतु तुम्हाला माहिती आहे का की एन्युरिझम देखील तुमच्यासाठी मोठा धोका असू शकतो. जर्मन फिटनेस इंफ्लुएंसर आणि बॉडीबिल्डर 'जो लिंडनर'चे या वर्षी जुलैमध्ये निधन झाले, तो फक्त 30 वर्षांचा होता. लिंडनरला एन्युरिझमचा त्रास होता.

GEN-Z लोकांनी सतर्क राहावे

GEN-Z गटातील लोकांमध्ये गंभीर हृदयविकार आणि हार्ट अटॅक यासारख्या समस्यांचा धोका झपाट्याने वाढला आहे.

बालपण आणि पौगंडावस्थेतील लठ्ठपणा किंवा उच्च बीएमआयची समस्या हृदयविकार वाढवत आहे. याशिवाय तरुण आणि प्रौढांमध्ये रक्तदाबाची समस्याही वाढली असून, हे हृदयविकाराचे कारण मानले जाते.

2024 मध्ये हृदयाची काळजी कशी घ्यावी

हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आरोग्य तज्ञांनी हे उपाय सुचवले आहेत ज्यांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. 2024 मध्ये या गोष्टींचे पालन करण्याचे ठरवा.

  • निरोगी आहार घ्या.

  • सक्रिय रहा, नियमित व्यायामाची सवय लावा.

  • वजन नियंत्रित करण्यासाठी उपाय करा.

  • धुम्रपान आणि सेकंडहँड स्मोक या दोन्हीपासून दूर राहा.

  • तुमचे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियमितपणे तपासा आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय करा.

  • दारूचे सेवन अजिबात करू नका.

  • तणाव व्यवस्थापित करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()