आपण पाहिले असेल की, अनेकदा लोकांसोबत असं घडतं की कोणत्याही कारणाशिवाय त्यांचा मूड खराब होतो किंवा त्यांना वाईट वाटू लागतं. एखाद्या व्यक्तीच्या मूडमध्ये अचानक मोठा बदल होत असेल तर त्याला मूड स्विंग म्हणतात.
अशा स्थितीत व्यक्ती एका क्षणी आनंदी असेल तर दुसऱ्या क्षणी अचानक दुःखी होते. हे कोणाच्या बाबतीतही होऊ शकतं आणि याची अनेक कारणे असू शकतात.अशा परिस्थितीत मानसिक समस्यांवर योगासने खूप प्रभावी ठरू शकतात. मूड स्विंग्ज ही एक समस्या आहे ज्याचा बहुतेक महिलांना त्रास होतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही योगासनाबद्दल सांगणार आहोत, जे मूड स्विंगच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.
या आसनाच्या सरावाने राग आणि तणाव नियंत्रित होतो. शष्कासनाला शशांक आसन असेही म्हणतात, कारण या योगासनाच्या अभ्यासादरम्यान शरीराचा आकार सशासारखा होतो. त्याच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, हे केवळ मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त नाही तर पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यास देखील मदत करते.
सिंहासनाचा सराव थायरॉईड ग्रंथींचा स्राव नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. अशा परिस्थितीत, त्याचा नियमित सराव नकारात्मक भावना काढून टाकण्यास आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतो. यासोबतच नाक, कान, घसा या आजारांवरही ते फायदेशीर आहे.
भुजंगासनाच्या सरावाने फुफ्फुस मजबूत होतात, ज्यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून खूप आराम मिळतो. या योगाचा नियमित सराव केल्याने नकारात्मक विचार आणि मानसिक नैराश्यापासून आराम मिळतो. त्यामुळे जे लोक नेहमी नकारात्मक विचारांनी त्रस्त असतात त्यांनी भुजंगासनाचा सराव करावा.
सर्वांगासनाचा सराव केल्याने थायरॉईडशी संबंधित विकार दूर होण्यास मदत होते. अशाप्रकारे, हे योगासन हार्मोनल असंतुलन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.