Yoga For Belly Fat : पोटावर साचलेली चरबी या 2 योगासनांच्या मदतीने झटक्यात होईल कमी, जाणून घ्या योग्य पद्धत

बेली फॅटचा प्रभाव तुमच्या पर्सनॅलिटीवरही दिसून येतो.
Yoga For Belly Fat
Yoga For Belly Fatesakal
Updated on

Yoga For Belly Fat : हल्ली प्रत्येक व्यक्ती बैठ्या पद्धतीच्या कामामुळे पोटाच्या वाढत चाललेल्या चरबीबाबत चिंतेत दिसतो. पोटावर चरबी वाढण्यामागे ही काही कारणं कारणीभूत असू शकतात. जसे की, सतत बसून काम करणे, शारीरिक हालचाल कमी होणे, फास्ट फूड खाणे. बेली फॅटचा प्रभाव तुमच्या पर्सनॅलिटीवरही दिसून येतो. तेव्हा तुमच्या आहाराकडे लक्ष देण्याबरोबरच नियमित ही दोन योगासने करा.

उत्तान पादासन-

उत्तान पादासनाचा सराव करणे खूप सोपे आहे. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पाठीच्या भारावर चटईवर झोपावे, दोन्ही हातांना थाइजवर ठेवून दोन्ही पायांचे गुडघे, घोटे आणि अंगठे जोडावेत. हे करत असताना पाय सरळ ठेवा. आता दीर्घ श्वास घेऊन दोन्ही पाय ४५ अंशांवर हलवा. सुरुवातीला तुम्हाला थोड्या वेदना जाणवू शकतात, परंतु तुम्ही या आसनाचा सतत सराव केल्यास हळूहळू तुम्हाला सवय होईल. आसन करत असताना, तुमचा पाय जसजसा वर येईल, तसतसा तो 90 अंशांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. हा योग करण्यापूर्वी कोणताही स्ट्रेचिंग व्यायाम करा. हा योग केल्याने तुमच्या कंबर, नितंब आणि थाइजवरची चरबी कमी होण्यास मदत होते. (Health)

Yoga For Belly Fat
Belly Fat Loss: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा ही 4 सोपी योगासने

भुंजगासन-

पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही भुंजगासनाला तुमच्या व्यायामाचा भाग देखील बनवू शकता. भुजंगासनाला कोब्रा पोज असेही म्हणतात. हे आसन करण्यासाठी पोटाच्या बळावर जमिनीवर झोपावे आणि खालचे शरीर जमिनीला चिकटून ठेवावे, परंतु असे करताना कंबरेपासून वरचा भाग उचलून मागे वळून हात समोर ठेवावेत. काही काळ या अवस्थेत राहिल्यानंतर, सामान्य स्थितीत परत या. (Lifestyle)

अशाप्रकारे या दोन योगासनांच्या मदतीने तुम्ही शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.