Yoga For Eyes : दिवसभर स्क्रीनसमोर करताय काम, तर ही योगासने फायदेशीर ठरतील, डोळ्यांवर येणार नाही ताण

स्क्रीन टाईम केवळ काम करणाऱ्या लोकांचा वाढला आहे, असे नाही. तर लहान मुलांमध्येही ही समस्या वाढली आहे.
Yoga For Eyes
Yoga For Eyes esakal
Updated on

Yoga For Eyes :

सध्याची कामाची पद्धतही फार अडव्हान्स झाली आहे. कारण, जो तो व्यक्ती मिळेल त्या स्क्रीनवर काम करतो. कोणी लॅपटॉप,कोणी कॉम्प्युटर तर कोणी मोबाईलवर काम करत असतो. या बदललेल्या लाईफस्टाईलमुळे प्रत्येकाला डोळ्यांचे आजार होत आहेत. त्याला बळी पडावे लागत आहे.

स्क्रीन टाईम केवळ काम करणाऱ्या लोकांचा वाढला आहे, असे नाही. तर लहान मुलांमध्येही ही समस्या वाढली आहे. कारण, लहान मुलांचे मोबाईल पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डोळ्यांची दृष्टी तर कमी होतेच. पण, त्याचबरोबर डोळे दुखणे, डोळ्यांमध्ये आग होणे अशा समस्यांनाही सामोरे जावे लागते.   

Yoga For Eyes
Yoga for eyes : सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे सुजलेले दिसतात? मग दररोज करा ही योगासनं

डोळ्यांच्या या तक्रारींवर अनेक उपाय केले जातात. आयुर्वेदीक, वैद्यकीय आजारांमधूनही यावर परिणाम होत नाही. काही वेळा अशा उपायांचे परिणामही वाईट होतात. त्यामुळेच डोळ्यांच्या सर्व तक्रारी दूर करण्यासाठी तुम्हाला काही योगासने येणं गरजेचं आहे. या योगासनांचा दररोज सराव केल्यास तुमचे डोळे अधिक स्पष्ट पाहू लागतील.

शीर्षासन

डोळ्यांसाठी हे योगासन फायदेशीर आहे. शीर्षासन करणे केवळ डोळ्यांसाठीच नाही तर आपला मेंदू, त्वचा आणि केसांच्या आरोग्यालाही अनेक फायदे मिळवून देतो. सुरूवातीला हे योगासन कठीण वाटत असले तरी त्याचा नियमित सराव केल्यास तुम्हाला त्याचा फायदाच होईल. 

Yoga For Eyes
Yoga for eyes : सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे सुजलेले दिसतात? मग दररोज करा ही योगासनं

भ्रामरी प्राणायम

सर्वात सोपा योगा म्हणून प्राणायमाकडे पाहिले जाते. प्राणायम करण्याचे आपल्याला अनेक फायदे आहेत. पण, तुम्हाला माहितीय का भ्रामरी प्राणायण करणे तुमची दृष्टी सुधारू शकते. या योगासनाच्या सरावाने एग्जायटी आणि तणाव दूर करण्यासाठी देखील होतो. तणाव दूर झाल्यानेही आपल्या डोळ्यात फरक जाणवतो. या प्राणायमाचा सराव मुलांनी केला तर त्यांची बुद्धी तल्लख होण्यासही मदत होते.

Yoga For Eyes
Eye Health : डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात करा समावेश

२०-२०-२० चा नियम 

तुम्ही दिवसभर स्क्रीनकडे पाहत असाल तर तुम्ही २०-२०-२० चा नियम पाळायला हवा. तो नियम इतका सोपा आहे की त्याने तुम्हाला जास्त फायदे होतील. त्यासाठी इतकंच करायचं की, तासातील प्रत्येक मिनिटानंतर २० फूट अंतरावर असलेल्या वस्तूकडे २० सेकंद पहायचं आहे.

Yoga For Eyes
Yoga for eyes : सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे सुजलेले दिसतात? मग दररोज करा ही योगासनं

हातांची ऊब डोळ्यांना द्या

दिवसभराच्या ताणातून डोळ्यांना रिलॅक्स करण्यासाठी तुम्हाला इतकच करायचंय की, थोड्या थोड्यावेळाने तुम्ही तुमचे हात चोळून डोळ्यांवर ठेवायचे आहेत. सतत स्क्रीनकडे पाहताना तुमचे डोळे ताणले जातात. त्यावर ताण पडतो. त्यामुळे तुम्ही डोळ्यांवर गरम हात ठेवल्याने त्यांना आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.