वृत्ती सरूप्रम इतरत्रः : अन्य वेळी, चित्तरूपाचे चढउतार अचुकतेने ओळखणारा सिद्धपुरुष
वृत्ती : चढउतार, सुधारणा
स्वरूपम : ओळखणे, जवळीक, आणखी जवळ
इतरत्रः : अन्य वेळी
सिद्धपुरुष चेतनेने किंवा समोर दिसत असलेल्या वस्तूंनी एखादी गोष्ट पाहतो, त्या वेळी तो त्यांच्याशी एकरूप होत त्यातील भव्यता विसरून जातो. आपण मागच्या सूत्रात पाहिले की वेगळ्या पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे पाहिल्यास आपल्याला काय जाणवते. या दिवाळीत आपण सर्वांनी तो अनुभव निश्चितच घेतला असेल. आपल्याजवळ असलेल्या गोष्टींची जाणीव झाल्यावर आपण स्वतःला विसरून जातो आणि त्या गोष्टींशी जवळीक निर्माण होते. मी खात्रीने सांगते की, या दिवाळीत तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची खरेदी केली असेल. मात्र त्यापैकी किती गोष्टी तुम्हाला कायम आनंदी ठेवतील, याचा विचार केला का? तुम्हाला एक दिवस खरेदी केलेल्या त्या गोष्टींची कंटाळा येईल आणि आणि त्यावेळी तुम्हाला नवीन वेगळे काहीतरी हवे असेल. पुरुषत्व, स्वत्व किंवा आत्मा हे त्यांच्या नैसर्गिक स्थितीत नसतात, तेव्हा काय घडते हे सूत्रात सांगितले आहे.
चित्तवृत्ती निरोध अवस्थेत नसल्यावर त्याचे प्रकार किंवा त्यात होत असलेले बदल आत्म्यावर म्हणजेच पर्यायाने पुरुषार्थावर लादले जातात. अर्थात, या प्रकारांना प्रकृतीचा खेळही म्हणता येईल. आपणास या चुकीच्या ओळखी अगदी नित्याच्या सरावाच्या झालेल्या असतात. आपण एखादा चित्रपट किंवा रंगमंचावर नाटक पाहत असतो, त्यावेळी समोर दिसणाऱ्या दुश्यांशी आपण स्वतःला ताडून पाहत असतो. त्यातून दुःख, आनंद, भीती, आवड-निवड आदी भावनांची अनुभूती घेत असतो. समोरच्या दृश्यात दिसणारे कलाकार केवळ भूमिका म्हणून अभिनय करत असले तर आपणही त्यातून स्वतःची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रेक्षक म्हणून ते दृश्य पाहत असतो, हेच आपण विसरूनच जातो. अगदी त्याचप्रमाणे पुरुष हा केवळ जाणिवेचा साक्षीदार आहे. परंतु तो त्याचे खरे स्वरूप विसरला आहे. अशा परिस्थितीत चित्त किंवा त्याचे स्वरूप किंवा त्यात होणारे बदल समजून घेत नाही किंबहुना ओळखू शकत नाही, तोपर्यंत स्वतःला त्यातून बाहेर काढणे कठीण काम आहे.
महर्षी पतंजलींनी सांगितलेल्या योगशास्त्रात विविध तंत्रांची भिन्न-भिन्न प्रवृत्ती, प्रकृती असणाऱ्या व्यक्तींसाठी माहिती दिली आहे. त्यायोगे मनःशांती आणि चित्त निरोध स्थितीत आणण्यासाठी मदत होते. त्या अवस्थेत पुरुषाला त्याचे खरे स्वरूप लक्षात येते. आपल्या सर्व आसक्ती, लालसा आणि आत्म्याच्या खऱ्या ओळखीचा शुद्ध प्रकाश चमकू देत त्याचबरोबर स्वतःमधील जाणीव आणि प्रेमाच्या, आनंदाच्या स्थितीत सदैव राहावे, अशा दिवाळीच्या व नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा देते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.