Yoga Outfits Accessories : आपण फिट रहावं छान दिसावं असं प्रत्येकाला वाटत, यासाठी अनेक लोकं रेग्युलर व्यायाम करतात. नवीन वर्ष सुरू झाले आहे; सगळ्यांनीच नवनवीन संकल्प केले असतील; त्यात योगा करण्याचा निर्णय नक्कीच खूप मोठा आणि गरजेचा म्हणावा लागेल. पण यात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपल्या कडे यासाठीच्या सगळ्या अॅक्सेसरीज असतीलच असं नाही. म्हणूनच आता योगा सुरू करण्यासाठी आधी या गोष्टी आपल्या सोबत घेऊन ठेवा; म्हणजे नंतर त्रास होणार नाही.
1. योगा ड्रेस
मुळात योगा ड्रेस असं काही वेगळं नसतं, फक्त स्ट्रेचेबल आणि आपल्याला कम्फर्टेबल असा ड्रेस घ्यावा असा सल्ला आपले फिटनेस ट्रेनर आपल्याला देतात. तरी त्यातल्या त्यात स्लिम फिट लेगिन्स, ट्रॅक पॅंट आणि स्पोर्ट्स टि बॅक किंवा टि शर्ट लोकांना आवडतात.
2. शूज
व्यायाम करतांना सगळेच फिटनेस ट्रेनर तुम्हाला स्पोर्ट्स शूजचा सल्ला देतील. याने पायाला छान ग्रीप मिळते आणि पाय मुरगळण्याचा धोका वाचतो. शिवाय जर तुम्ही बाहेर ट्रेकिंगला किंवा सायकलिंगला जात असाल तर त्यात शूज खरंच गरजेचे आहेत.
3. योगा मॅट
अनेक लोकं विचार करतात की वेगळी अशी मॅट का घ्यावी, साधी सतरंजीही टाकू शकतो. पण खरंतर या स्पेशल योगा मॅट खूप मऊ असतात आणि योगा करतांना जर चुकून पडायला झालं तर तेव्हा या मॅटमुळे लागत नाही.
4. शेकर
व्यायाम करणं आलं म्हणजे सोबत डाएट सुद्धा आला. बाकी काही नाही पण हेल्दी शेक तरी सगळ्यांनाच घ्यावे लागतात आणि त्यांच एक प्रमाण असतं, आता हे नक्की किती प्रमाणात घ्याव यासाठी आपल्याला शेकर लागतं. शेकरच्या बाहेरच्या बाजूला त्यावरती ml मध्ये माप लिहिलेल असत.
5. जॅकेट
अनेकदा आपण बाहेर चालायला जातो कित्येक लोकं रोज सकाळी टेकडीवर जात असतात. किंवा जिमला जातात तेव्हा आपल्या योगा ड्रेसवर थंडीच जॅकेट जरा बरं पडतं शिवाय हे खूप स्टायलिश सुद्धा दिसतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.