भारतीय संस्कृती आणि परंपरांनी जगाला काही अमुल्य ठेवा दिला आहे. ज्यात आपल्या भारताच्या योगांचाही समावेश होतो. संपूर्ण जगाला औषधांशिवाय दुखणं पळवण्याचा अन् निरोगी आयुष्य जगण्याचा मंत्रच भारताने दिला आहे.
जगातील अनेक लोकांच्या दिवसाची सुरूवात ही चहा कॉफीने नाहीतर प्राणायमाने होते. प्राणायम केल्याने मनशांती मिळते. इंद्रिये आणि मन निर्दोष व निरोगी ठेवून समाधीकरिता आवश्यक असलेली योग्यता निर्माण करण्याची साधना म्हणजेच प्राणायम होय.
प्राणायमाचे अनेक फायदे आहेत. पण ते योग्य पद्धतीने केले तरच त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला मिळतो. त्यामुळे प्राणायम करण्याचे काही नियम जे योगगुरू स्वामी रामदेव यांनी त्यांच्या ‘प्राणायम रहस्य’ या पुस्तकात सांगितले आहेत. ते आपण पाहुयात.
प्राणायमचे नियम
प्राणायम शुद्ध सात्विक आणि निर्मळ स्थानावर करावे. शक्य असेल तर खळखळत्या पाण्याजवळ, शांत नदीकिनारी प्राणायम करावे.
शहरात हवा प्रदुषित असलेल्या जागी प्राणायम करणार असाल. तर ते करण्याआधी ती जागा तूप आणि गुग्गुळाने सुगंधीत करून घ्यावी. आणि प्राणायमाच्या जागी तूपाचा दिवा लावावा.
प्राणायम करताना थकल्यासारखे वाटले तर थोडावेळ थांबून व्यायाम करावा.
प्राणायमाच्या दिर्घ अभ्यासासाठी संयम व सदाचाराचे पालन करावे. जेवण सात्विक ठेवावे आणि दूध, तूप, बदाम आणि फळांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
शुद्ध मनाने स्नान करून मगच प्राणायम करावे, याचा अधिक फायदा होतो. (Pranayam)
प्राणायम केल्यानंतर लगेचच चहा,कॉफी आणि इतर मादक पदार्थांचे सेवन करू नये
प्राणायमानंतर दूध, दही, ताक, लस्सी, फळांचे रस,हिरव्या पालेभाज्यांचे रस, फळांचे सेवन करावे.
प्राणायमानंतर नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्य, दलिया, खिचडी असे पचनास हलके असतील ते पदार्थ खावेत. तुम्ही रोज घेत असलेले तेलकच, तुपकट पदार्थ न घेणे योग्यच राहील. (Swami Ramdev)
सकाळी उठल्यानंतर प्रथम पाणी प्यावे, तसे करणे उत्तम आरोग्यासाठी लाभदायी ठरते.
गर्भवती महिलेने प्राणायम करताना कपालभारती, बाह्यप्राणायम आणि अग्निसार क्रिया सोडून उर्वरीत प्राणायम आणि बटरफ्लाय असे व्यायाम जमतील तसे हळूहळू करावेत.
महिलांनी मासिक पाळीच्या काळातही जास्त शारीरिक व्यायाम न करता जमेल तसे व्यायाम करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.