Yoga Tips: स्वातंत्र्यदिनी करा निरोगी राहण्याचा संकल्प, 'या' 4 आसनांचा करा सराव

Independence Day 2024: निरोगी आणि फिट राहण्यासाठी काही सोप्या आसनांचा सराव करू शकता.
Yoga Tips:
Yoga Tips:Sakal
Updated on

Independence Day 2024: निरोगी राहण्यासाठी योगा करणे फायदेशीर असते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी नियमितपणे योगासनांचा सराव करावा. स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही निरोगी राहण्याचा संकल्प करत असाल तर पुढील काही सोप्या योगासनांचा सराव करू शकता. त्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, शुगर, गुडघेदुखी, शुगर यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. शारीरिक समस्यांपासून दूर राहण्यासाठी आणि स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वत:साठी वेळ काढा आणि पुढील योगासनांचा सराव करावा.

Dhanurasan
DhanurasanSakal

धनुरासन

धनुरासनामुळे अनेक समस्या दूर राहतात. या योगामुळे स्नायूंना ताणले जाते, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते. धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपा, गुडघे वाकवा आणि पायाचे घोटे तळहाताने धरा. आता आपल्या क्षमतेनुसार आपले पाय आणि हात वर करा. वरच्या दिशेने पाहताना काही वेळ या स्थितीत राहा आणि नंतर सामान्य स्थितीत या.

Yoga Tips:
Yoga for Healthy Hair : केस खूप गळतात, हैराण आहात? मग रोज करा ही योगासनं... लवकरच दिसेल फरक
Balasana
BalasanaSakal

बालासन

बालासन केल्याने शरीर लवचिक राहते. तसेच मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो. बालासन करण्यासाठी वज्रासन स्थितीत जमिनीवर बसा आणि श्वास घेताना दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ करा. नंतर श्वास सोडा. आपले तळवे आणि डोके जमिनीवर ठेवून दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. हातांची बोटे एकमेकांना जोडून दोन्ही तळहातांमध्ये डोके हलक्या हाताने ठेवा. काही काळानंतर, जुन्या स्थितीत परत या. 

Sukhasana
SukhasanaSakal

सुखासन

सुखासनाचा सराव केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहते. जेणेकरून श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवता येईल. या आसनाचा सराव करण्यासाठी जमिनीवर पाय रोवून बसा आणि दोन्ही डोळे बंद करा आणि आपले तळवे गुडघ्यावर ठेवा. मग दीर्घ श्वास घ्या. ही प्रक्रिया पुन्हा करा. 

Malasan
MalasanSakal

मलासन

मलासनाचा सराव केल्याने पायाचे हाडे मजबूत होतात. तसेच पायचे दुखने कमी होते. मलासनाचा सराव करण्यासाठी चटईवर सरळ उभे राहावे. नंतर गुघघे वाकवून नमस्ते पोडमध्ये हात ठेऊन खाली बसण्याचा प्रयत्न करावा. या दरम्यान गुडघ्यांमधील अंतर ठेवा. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.