Weight Loss Tips : नुसतं ढेरीकडे पाहून वजन कमी होणार नाही, रामदेव बाबांचा सल्ला ऐका, महिन्यात २० किलो वजन कमी होईल

Ramdev Baba Weight Loss Formula : तुम्हाला योग्य प्रकारे वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी योगगुरू रामदेवबाबा यांनी काही सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Weight Loss Tips
Weight Loss Tipsesakal
Updated on

Ramdev Baba Weight Loss Formula :

आजकाल लोक वाढत्या वजनाने त्रस्त आहेत. कारण, घरात एखादी व्यक्ती तरी अशी असते जिला वजन कमी करायचं असतं. किंवा जी सतत वजन कमी करण्यासाठी धडपड करत असते. आपली चुकीची लाईफस्टाईल ही गोष्ट यासाठी कारणीभूत आहेच. पण, त्याचसोबत काही शस्त्रक्रिया, महिलांचे गर्भारपण यामुळेही वजन अवाढव्य वाढते.

त्यामुळे एका विशिष्ट वयोगटातील लोक वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. काही लोक वजन कमी व्हावे यासाठी औषधांचाही वापर करतात. पण, हे चुकीचे आहे. कुठल्याही औषधाचा वापर करून कमी केलेलं वजन कधीही लाभदायी ठरणार नाही.

Weight Loss Tips
Weight Loss Tips : वजन इतकं वाढलंय की कपडे बसेनासे झालेत? रात्रीच्यावेळी हे पदार्थ खायचे बंद करा, फरक जाणवेल

तुम्हाला योग्य प्रकारे वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी योगगुरू रामदेवबाबा यांनी काही सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. बाबा रामदेव हे योगासनांचा सराव करण्यास सांगतात. पण ते अशाही काही गोष्टी सांगतात ज्यासाठी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी योग करण्याची गरज नाही. तुम्ही वजन कमी करण्यासाठी कोणता डायट करू शकता, कोणत्या औषधी वनस्पतींचे सेवन करावे, याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Weight Loss Tips
Weight Loss Tips : फास्ट वजन कमी करण्यासाठी उरले फक्त १५ दिवस? हे बदल करा आणि फरक अनुभवा

नाश्त्यात खा दलिया (Healthy Breakfast For Weight Loss)

बाबा रामदेव यांच्या आयुर्वेदिक आहारानुसार नाश्त्यात दलिया खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. फक्त कोणतेही विकतचे दलिया यासाठी आणू नका. तर, गहू, मूग, बाजरी, तांदूळ आणि तीळ मिसळून तयार करायची आहे. हे सर्व पदार्थ तुम्ही एकत्र करून भरडून आणावेत.

ही लापशी खाल्ल्याने तुम्हाला जास्त दिवस भूक लागणार नाही. तसेच, सर्व पोषक तत्वांचा पुरवठाही मुबलक प्रमाणात होईल.

Weight Loss Tips
​Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे करा दह्याचे सेवन... काही दिवसात दिसेल फरक

दुधीचा रस प्या (Bottle Green Juice For Weight Loss)

लठ्ठपणावर नियंत्रण ठेवायचे असेल तर दुधीचा रस प्यावा, असे बाबा रामदेव यांचे मत आहे. दुधीच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे भूक नियंत्रित राहते. अशा स्थितीत वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दुधीचा रस पिऊन दिवसाची सुरुवात करा. यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल. तसेच, कोणताही आजार जवळपास फिरकणार नाही.

Weight Loss Tips
Weight Loss: जीम, डाएट करूनही वजन कमी होत नाहीये? असू शकतात 'ही' ५ कारणे!

अश्वगंधाची पाने (Ashwagandha For Weight Loss)

तुम्ही आजवर अनेक पानांचा चहा प्यायला असाल. पण वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अश्वगंधा या औषधी वनस्पतीचा फायदा होईल. फक्त या पानांचे सेवन दररोज करा. अश्वगंधाची तीन ते चार पाने दररोज चावून खा. 15 ते 20 किलो वजन सहज कमी होईल.

अश्वगंधाच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे चरबी लवकर कापण्यास मदत करतात. त्यामुळे रोज सकाळी, दुपार आणि संध्याकाळी अश्वगंधाची तीन पाने चावून खावीत. याचा वजन कमी होण्यासाठी नक्की फायदा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()