5 best tips for healthy lifestyle: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तसचं योग विज्ञानामध्ये अशा अनेक साधारण गोष्टी आहेत. ज्या निरोगी आयुष्यासाठी महत्वाच्या आहेत. काळानुसार या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं गेलं.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या Science and Technology आधुनिक सतत धावणाऱ्या जगात अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आरोग्यावर दिसू लागले आहेत. Yogic Science Tips in Marathi for Healthy Life
यामुळेच नवेनवे आजार, साथीचे रोग, जीवनशैलीमुळे Life Style उत्पन्न होणारे आजार डोकं वर काढू लागले आहेत. मात्र जर आपण या योग्य विद्येतील काही साध्या गोष्टी आचरणात आणल्या तर निरोगी आयुष्य Healthy Life जगण्यासाठी मोठी धडपड आणि पैसादेखील खर्च करावा लागणार नाही.
योगिक विज्ञानात काही असे साधेसोपे उपाय आहेत जे निरोगी आयुष्यासाठी उत्तम आहेत. उपवास करणं, उठण्याबसण्याच्या सवयी, पाण्यासाठी योग्य भाड्यांचा वापर अशा काही गोष्टींमुळी निरोगी राहणं सहज शक्य आहे. इशा फाउंडेशनच्या सद्गुरूंनी अशाच काही गोष्टींचा उलगडा केला आहे. ज्या आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोतं.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे-
गेल्या काही वर्षांमध्ये काही वैज्ञानिकांनी पाण्याच्या गुणवैशिष्ट्यांवर अभ्यास केला आहे. संशोधनातून असं समोर आलंय की पाण्याला एक स्मरणशक्ती असते. पाणी ज्या वस्तूला स्पर्श करतं त्या वस्तूचे गुण लक्षात ठेवतं.
पाण्याला स्मरणशक्ती असल्याने आपण ते कोणत्या भांड्यात ठेवतो हे खूप महत्वाचं आहे. जर पाण्याला रात्रभर किंवा कमीत कमी चार तासांसाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलं तर पाणी तांब्यातील काही गुण सामावून घेतं. तांब्याच्या भांड्यातील हे पाणी खास करून तुमच्या लिव्हर आणि स्वास्थ्यासोबतच शक्ती आणि स्फूर्तीसाठी लाभदायक असतं.
जर पाणी खूप जास्त प्रेशरने असंख्य वळणं घेत लोखंडी किंवा प्लास्टिकच्या पाईपातून तुमच्या घरापर्यंत पोहचतं तेव्हा अनेक वळणं घेतल्याने पाइपमध्ये घर्षण होत आल्याने त्यात दोष निर्माण होतो. मात्र पाण्यामध्ये स्मरणशक्ती सोबत मूळ रुपात पुन्हा येण्याची शक्ती देखील असते.
त्यामुळे जर तुम्ही नळातून आलेलं पाणी एका तासासाठी न ढवळता तसचं शांत ठेवलं तर त्यातील दोष नष्ट होतात. यासाठीच प्लास्टिक बॉटल किंवा थेट नळातून पाणी न पिता ते तांब्याच्या भांड्यात साठवून पिणं जास्त उपयुक्त आहे. निरोगी राहण्यासाठी ही एक महत्वाची गोष्ट आहे.
हे देखिल वाचा-
शरिराला झोप नव्हे तर आराम द्या
असं म्हंटलं जातं शरीराला आराम देण्यासाठी किमान आठ तासांची झोप ही गरजेची आहे. मात्र तुमच्या शरीराला झोपेची नव्हे तर आरामाची जास्त गरज असते. जर तुमचं काम, तुमची एक्सरसाइज किंवा इतर कोणतीही गोष्ट तुम्ही आरामात केली तर तुम्हाला आपोआप कमी झोपही पुरेशी होईल.
अलिकडे प्रत्येक गोष्ट तणाव घेऊन केली जाते. यामुळेच आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. तुम्ही किती शारीरिक कष्ट करता यावर तुमची झोप ठरते.
किती कॅलरिज खाव्या आणि किती झोपावं याचं गणित म्हणजे तुमचे शारीरिक कष्ट. सध्या ज्या प्रकारचं काम आणि जीवनशैली आपण जगत आहोत त्यात कमी कष्ट असल्याने कमी खाणं गरजेचं आहे. एकंदरच जर जास्त शारीरिक कष्ट असतील तर जास्त झोप गरजेची असते.
मुळात तुमच्या शरिराला पूर्ण आराम मिळाला की ते आपोआप उठतं. मग ते पहाटे ३ वाजता असो की सकाळी ८ वाजता. उठण्यासाठी कोणत्याही अलार्मची आवश्यकता नको. एकदा शरीराला आराम मिळाला की ते उठायला हवं. असं सद्गुरू म्हणतात.
दोन आठवड्यातून एकदा तरी उपवास करा
तुमच्या शरिरात नैसर्गाच्या चक्राशी जोडलेलं एक ‘मंडळ’ नावाची गोष्ट असते. याचात अर्थ दर ४० ते ४८ दिवसांमधून शरीर एका खास चक्रातून जात असतं. या प्रत्येक चक्रातील ३ दिवस असे असतात जेव्हा तुमच्या शरिराला अन्नाची आवश्यकता नसते.
जर तुम्ही नीट लक्ष दिलंत तर तुमच्या लक्षात येईल की १२-१५ दिवसातील एखादा दिवस असा असतो जेव्हा तुमची काही खायची इच्छा होत नाही. अशा दिवशी तुम्ही काहीच खाऊ नये.
प्राण्यांमध्येही अशीच रचना पाहायला मिळते. मात्र प्राण्याना आपोआप त्या दिवसाची जाणिव होते. मात्र आपल्याला कामाच्या आणि इतर गोष्टींमुळे तो दिवस ओळखणं शक्य नसल्यानेच एकादशी हा दिवस ठरवण्यात आला. एकादशी दर १४ दिवसांनी येते. त्यामुळे दर १४ दिवसांनी उपवास करावा. कामामुळे किंवा इतर काही गोष्टींनी संपूर्ण उपवास शक्य नसेल तर त्या दिवशी केवळ फलाहार करावा.
ज्यांना चहा-कॉफीची सवय असते अशा अनेकांना प्रवास करणं कठीण जातं. त्यामुळे उपवास करण्याआधी खाण्या पिण्याच्या सवयी बदलणं गरजेचं आहे. शिवाय जबरदस्ती उपवास करू नये यामुळे फायदा होण्याएवजी शरिरावर नकारात्मक परिणाम होवू शकतो.
हे देखिल वाचा-
पाठ ताठ ठेवून बसणे
शरिरातील अधिकतर महत्वाचे अवयव हे छाती आणि पोटाभोवती असतात. हे अवयव कठिण नसतात किंवा एखाद्या नटबोल्टने एखाद्या ठिकाणी जोडले गेलेल नसतात. तर हे अवयव आपल्या शरिरात हाडांच्या सापळ्याच्या आत एकाप्रकारे एका पाळण्याप्रमाणे केवळ लटकलेले असतात. या सर्व अवयवांना जर तुम्ही पाठिचा कणा ताठ ठेवून बसलात तरच आराम मिळतो. त्यामुळे पाठिचा कणा ताठ ठेवून बसणं अधिक महत्वाचं आहे.
अवयवांना आराम देणं म्हणजे टेकून बसणं किंवा पुढे झुकून बसणं नव्हे. यामुळे शरिराच्या आतील अवयवांना आराम मिळत नाही. खास करून जेवल्यावर अनेक जण आराम खुर्चीत बसतात.
किंवा प्रवास करताना तासंतास आरामदायी खुर्चीत टेकून बसतात. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. पाठिचा कणा ताठ ठेवल्यानेच या अवयवांना आराम मिळणं शक्य आहे.
५.पंचतत्वांशी एकरूप होवून जगा-
मानवी शरीर हे पंचतत्वातून निर्माण झालंय त्यामुळे त्याच्याशी एकरुप होवून जगणं महत्वाचं आहे. अलिकडे आपण कायम सुटाबुटात इमारतींमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये काम करतो.
मात्र धरतीची संपर्कात राहणं गरजेच आहे. अनवाणी पायाने मातीत चाला. रोपं लावा. मातीशी धरतीशी संपर्क येऊ द्या. धरतीशी कमी संपर्क येऊ लागल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होवू लागल्या आहेत.
योगिक विज्ञानातील काही तत्वाचं सामान्य आयुष्यात अनुकरण केल्यास निरोगी जगण्याचा मार्ग अधिक सुखकर होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.