परफेक्ट ब्राझिलियन फिगरसाठी टिकटॉकर घालताहेत जीव धोक्यात... काय आहे BBL?

शस्त्रक्रियेदरम्यान हृदय, फुप्फुसे किंवा मेंदूपर्यंत चरबी पोहोचल्यास जीव जाऊ शकतो.
Brazilian Butt Lift
Brazilian Butt Liftgoogle
Updated on

मुंबई : टाळेबंदीत स्वत:च्या शारीरिक आरोग्याबाबत जागरूक झालेल्या स्त्री-पुरुषांची पावले आता Brazilian Butt Lift म्हणजेच बीबीएल शस्त्रक्रियेकडे वळली आहेत. नितंबांची अतिरिक्त वाढ आटोक्यात आणत पार्श्वभागाचे सौंदर्य खुलवणाऱ्या या शस्त्रक्रियेचा आधार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Brazilian Butt Lift
खरे सौंदर्य बुद्धिमत्तेचे अविनाश धर्माधिकारी यांचे मत; एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘ब्रिलियंटाईन डे’ साजरा

tiktokवर #BBL hashtag ला ४.९ अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. लंडनच्या मेरिलोबोर्न शहरातील Centre For Surgery येथे टाळेबंदीच्या काळात चौकशी भरपूर कॉल्स आले. यानुसार बीबीएल शस्त्रक्रिया करू इच्छिणाऱ्यांची संख्या २० ते २५ टक्क्यांनी वाढलेली दिसून आली.

बीबीएल शस्त्रक्रिया करताना शरीराच्या पार्श्वभागातील अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते; मात्र हे करत असताना काही प्रमाणात जीवाला धोका असतो. शस्त्रक्रियेदरम्यान हृदय, फुप्फुसे किंवा मेंदूपर्यंत चरबी पोहोचल्यास जीव जाऊ शकतो.

Brazilian Butt Lift
डॉ. पवार यांचे यश; उत्तर महाराष्ट्रातील अशी पहिली शस्त्रक्रिया

अॅस्थेटिक सोसायटीने २०१७ साली प्रकाशित केलेल्या अहवालानुसार दर ३ हजार शस्त्रक्रियांमध्ये एकाचा मृत्यू होतो. पश्चिम Yorkshire मधील २९ वर्षीय लिआह केंब्रिज, Dartford, Kent, येथील ३८ वर्षीय अबिम्बोला अजोक आणि नॉर्फोक येथील ३१ वर्षीय मेलिसा केर या महिलांचा टर्की येथे झालेल्या बीबीएल शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला होता.

अॅस्थेटीक सोसायटीच्या अहवालानुसार केवळ २०२० या एका वर्षात ४० हजार बीबीएल शस्त्रक्रिया झाल्या. सुंदर दिसण्याची इच्छा केवळ चेहऱ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता पार्श्वभागाचे सौंदर्य तरुणाईला महत्त्वाचे वाटत आहे. त्यासाठी जीव धोक्यात घालण्याचीही तयारी दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()