Parenting Tips: तुमचे मुलं पहिल्यांदाच शाळेत जात आहे? पालकांनो मग या गोष्टी नक्की ठेवा लक्षात

पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मनात शाळेविषयी भिती असते.
Parenting Tips
Parenting Tipssakal
Updated on

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या असून बहुतेक मुले शाळेत जाऊ लागली आहेत. तर दुसरीकडे पहिल्यांदाच शाळेत जाणार्‍या मुलांच्या प्रवेशाची प्रक्रिया देखील सुरू आहे. या परिस्थितीत जर तुमचं मूल देखील शाळेत पाऊल ठेवणार असेल तर पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

शाळेत जाण्याचे घरी ट्रेनिंग द्या: पहिल्यांदा शाळेत जाण्याच्या नावाखाली अशी अनेक मुले आहेत जी घाबरतात. त्यामुळे मुलांना प्रवेश घेण्यापूर्वी त्यांना जवळच्या शाळांना भेट देण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. तसेच, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांना घरीही शाळेत जाण्याची ट्रेनिंग देऊ शकता. एवढेच नाही तर मुलांसाठी तुम्ही शाळेसारखे वातावरण घरी तयार करू शकता आणि फोनवर शाळा दाखवून मुलांना ओळखीची जाणीव करून देऊ शकता.

Parenting Tips
Car Driving करत असताना मुसळधार पाऊस सुरू झाल्यास या गोष्टींची घ्या काळजी

प्रथम प्ले स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन घ्या: पालक साधारणपणे मुलांना थेट शाळेत प्रवेश घेतात. तर शाळेत थेट प्रवेश घेण्यापूर्वी काही काळ मुलाला प्ले स्कूलमध्ये पाठवणे चांगले. अशा प्रकारे मूल शाळेच्या वातावरणाशी परिचित होऊ लागते. यासोबतच तो तिथे उपस्थित असलेल्या इतर मुलांशी आणि शिक्षकांशीही मिसळायला लागतो आणि शाळेत प्रवेशाच्या वेळी कोणतीही अडचण येत नाही.

Parenting Tips
Kitchen Tips : घंटो का काम मिनटो में; आलं अशा पद्धतीने सोलून तर पहा!

मुलांशी गप्पा मारा

तुमचं मूल शाळेतून परतल्यावर त्याच्याशी गप्पा मारा, तुमच्या मुलाला बोलतं करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना त्यांच्या शाळेतील पहिला दिवस कसा होता हे नक्की विचारा. शाळेत सर्वात जास्त त्याला काय आवडले आणि शिक्षकांनी काय शिकवले हे विचारा. मुलाला जर काही गोष्टी समजल्या नसतील त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.