Zika Virus: झिका व्हायरस जीवघेणा ठरू शकतो का? वाचा डॉक्टर काय सांगतात

Zika Virus: पुण्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. हा आजार जीवघेणा ठरू शकतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Zika Virus:
Zika Virus: Sakal
Updated on

Zika Virus: पुण्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पुण्यातील एका गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात आता झिकाचे एकूण पाच रूग्ण आहेत. यामुळे नागरिकांना चिंतेत टाकले आहे. अनेक लोकांना असा प्रश्न पडला आहे की झिका व्हायरस हा जीवघेणा आहे का? या प्रश्नाचे उत्तर आरोग्य तज्ञांकडून जाणून घेऊया

झिका व्हायरस एडिस इजिप्ती डासांपासून होतो. झिका हा फ्लॅविव्हायरस वंशातील विषाणू आहे. युगांडामधील झिका जंगलातून हा विषाणू सर्वात पहिले १९४७ मध्ये वेगळा करण्यात आला होता. त्यावरून त्याला 'झिका' हे नाव पडले आहे. १९५० च्या दशकापासून आफ्रेकेतून आशियापर्यंतच्या विषुववृतीय पट्ट्यात विषाणूनचा प्रभाव आढळून येतो. २००७ ते २००६ पर्यंत हा विषाणू पुर्वेकडे, प्रशांत महासागर ओलांडून अमेरिकेपर्यंत पसरला. साधारणपणे मोठ्या व्यक्तींमध्ये हा आजार कमी प्रमाणात गंभीर असल्याचे दिसून येते. या आजाराने ग्रस्त जवळपास ८० टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत तर लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये साधारणपणे डेंग्यूसारखी लक्षणे असलेला ताप येतो.

झिका व्हायरसची लक्षणे

झिका व्हायरसची लक्षणे हे डेंग्यू आजाराप्रमाणे आहेत. झिका व्हायरसमध्ये रूग्णाला ताप येणे, डोळे लाल होणे, सांधेदुखी, डोकेदुखी आणि मॅक्युलोपॅप्युलर रॅश (पुरळ उठणे) ही लक्षणे दिसतात. ही लक्षणे साधारण सात दिवसांपेक्षा कमी काळ दिसतात आणि सुरुवातीच्या प्रादुर्भावामुळे यामुळे कोणताही मृत्यू झाल्याची नोंद नाही.

गर्भवती महिलांना कोणता धोका?

झिका व्हायरसचा प्रादुर्भाव हा गरोदरपणात झाल्यास त्यामुळे मायक्रोसेफॅली आणि मेंदूशी संबंधित आजार काही बाळांमध्ये होऊ शकतो. वयस्कांमध्ये होणार्‍या प्रादुर्भावामुळे गुलियन बार्रे सिंड्रोम (जीबीएस) आणि झिका व्हायरस मुळे मानवी श्वान्न पेशींमध्ये हा प्रादुर्भाव आढळतो. झिका व्हायरसची लक्षणे अशी लक्षणे असतील तर शारीरिक संबंध ठेवणे टाळावे. कारण, पुरूष किंवा स्त्रीच्या शरीरातील रक्तात झिकाचा विषाणू असेल आणि अशा व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले तर झिकाची लागण होऊ शकते. तसेच झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेऊन महिला गर्भवती राहिली असेल. तर गर्भातील बाळालाही याची लागण होऊ शकते. गर्भातील बाळासाठी हे धोकादायक ठरू शकते.

Zika Virus:
Zika Virus: पुण्यात आढळले झिकाचे ३ रूग्ण, जाणून घ्या हा व्हायरस आला तरी कुठून?

कसा बचाव कराल

डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी डीईईटी किंवा पिकारिडीन वर आधारीत डास प्रतिबंधकांचा वापर करणे, पुर्ण बाह्यांचे कपडे घालावे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि डास कमी करण्यासाठी साचलेले पाणी कमी करणे या उपायांचा समावेश आहे.

लस उपलब्ध आहे का?

झिका व्हायरसची सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही, आरोग्य कर्मचार्‍यांच्या मते ज्या महिला २०१५-१६ या दरम्यान झिका व्हायरसला बळी पडल्या होत्या त्या काळातील महिलांनी गरोदर राहू नये आणि गरोदर महिलांनी खास काळजी घ्यावी. सध्या विशेष असे कोणतेही दुसरे उपाय उपलब्ध नाहीत, पॅरेसिटॅमॉल (ॲसिटामिनोफेन) आणि उर्वरीत लक्षणांनुसार उपचार केले जातात आणि जर गरज भासल्यास रुग्णालयात दाखल करावे लागते.

डॉ. सुरुची मांद्रेकर कन्सल्टंट इंटर्नल मेडिसिन

मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.