Zika Virus: शारीरिक संबंध ठेवल्यानेही पसरतो झिका व्हायरस; कपल्सनी घ्यावी अशी काळजी

Zika virus prevention advice for couples from physical contact: डासांपासून मलेरीया, डेंग्यू असे जिवघेणे आजार होत असून झिकाही तसाच आहे
Zika Virus
Zika Virusesakal
Updated on

Zika Virus :

कोरोना नंतर आता पुन्हा एकदा गंभीर आजार आपल्याकडे चाल करून येत आहे. डासांमुळे पसरणारा झिका व्हायरस डोकं वर काढत आहे. झिका व्हायरसचे पुण्यात तीन रूग्ण सापडले आहेत. पावसाळ्यातील साथीचे आजार सुरूच असून त्यात आता झिका व्हायरसची भर पडली आहे.

डासांपासून मलेरीया, डेंग्यू असे जिवघेणे आजार होत असून झिकाही तसाच आहे. हा व्हायरसही डासांपासून पसरतो आहे. झिकाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता हा आजर कसा पसरतो आणि त्यात काय काळजी घ्यावी हे पाहुयात. (Zika Virus)

Zika Virus
Zika Patient : पुण्यात पुन्हा झिका, दूसरा रुग्ण आढळल्यामुळे दक्षतेचे आदेश

झिका व्हायरस काय आहे?

झिका व्हायरस हा डासांपासून होतो. हा आजारा भारतातील नसून त्याची सर्वात आधी युगांडामध्ये पसरला होता. १९४७ मध्ये युगांडातील रूग्णांना या व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर ब्राझीलमध्ये याचा उद्रेक झाला होता. सात ते आठ वर्षांपूर्वी झिका व्हायरसने अमेरिकेत उच्छाद मांडला होता. त्यानंतर हा आजार चर्चेत आला होता. आणि हा आजार आता भारतात आला आहे.

Zika Virus
Nashik Zika Virus Update: झिका रुग्ण आढळलेल्या भागात मच्छरदाणी वापरा! वैद्यकीय विभागाचा नागरिकांना सल्ला

शारीरिक संबंध ठेवल्याने झिका व्हायरस पसरतो का?

होय, २०१६ मध्ये जेव्हा झिका व्हायरस अमेरिकेत आला होता. तेव्हा शारीरिक संबंध ठेवल्याने तो अधिक पसरला होता,असे U.S.Center For Disease Control And Prevention (CDC) च्या झिका व्हायरस संदर्भात स्पष्ट झाले आहे.

या अमेरिकन सर्व्हेनुसार, 'या वर्षी व्हेनेझुएला शहरातून परतलेल्या व्यक्तीला एका आजारी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर झिका विषाणूची लागण झाली होती.

Zika Virus
Zika Virus News: पुण्यात झिका वायरसची दोघांना लागण, राज्याला धोका?

झिकाची लक्षणे काय आहेत

  • सौम्य ताप येणे

  • शरीरावर पुरळ उठणे

  • डोळ्यांतील खाज

  • स्नायू आणि सांधेदुखी

  • थकवा

Zika Virus
Zika Virus In Pune : पुण्यात का वाढतोय झिका विषाणूचा धोका? गर्भवती महिलांनी काय घ्यावी काळजी? घ्या जाणून

झिका व्हायरसची लक्षणे अशी लक्षणे असतील तर शारीरिक संबंध ठेऊ नयेत, असे डॉक्टर सांगतात. कारण, पुरूष किंवा स्त्रीच्या शरीरातील रक्तात झिकाचा विषाणू असेल , आणि अशा व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले तर झिकाची लागण होऊ शकते.

तसेच झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेऊन महिला गर्भवती राहिली असेल. तर गर्भातील बाळालाही याची लागण होऊ शकते. गर्भातील बाळासाठी हे धोक्याचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकेत सापडलेल्या १४ केसेस

२०१६ मध्ये अमेरिकेत झिकाची १४ संभाव्य प्रकरणे समोर आली होती. ज्यामध्ये हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरला होता.अमेरिकेतील 14 गर्भवती महिलांच्या तपासणीनंतर ही गोष्ट उघडकीस आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.