झूम ; छोटी कार, मोठा ‘पंच’!

आता टाटाने कॉम्‍पॅम्‍क्‍टमध्येही सब-कॉम्‍पॅम्‍क्‍ट एसयूव्‍ही श्रेणीतील पंच बाजारात आणून ही स्पर्धेत चुरस वाढवली आहे.
lifestyle
lifestylesakal
Updated on

नेक्सॉन, हॅरिअर, अल्ट्रोझला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर टाटाने भारतातील पहिली सब-कॉम्‍पॅम्‍क्‍ट एसयूव्‍ही श्रेणीतील ‘पंच’ ही कार नुकतीच बाजारात दाखल केली. अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी देणाऱ्या, आधुनिक वैशिष्ट्यांसह असलेल्या ‘पंच’च्या मॅन्‍युअल (एमटी) व ऑटोमॅटिक (एएमटी) ट्रान्स्मिशन या दोन्ही गिअर बॉक्समधील कार चालवण्याचा अनुभव घेतला. आत्मनिर्भर भारताची निर्मिती असलेली ‘पंच’ आकाराने लहान दिसत असली, तरी स्पर्धा पाहता रस्त्यावरील कामगिरीच्या जोरावर सरस ठरू शकते.

भारतीय बाजारात एसयूव्ही कार श्रेणीत असलेली स्पर्धा आणि सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन निस्सान मॅग्नाईट, ह्युंदाई व्हेन्यू, रेनॉ कायगर या कॉम्‍पॅम्‍क्‍ट एसयूव्‍ही श्रेणीतील कार बाजारात आल्याने कारप्रेमींना पर्याय मिळाला आहे. त्यात आता टाटाने कॉम्‍पॅम्‍क्‍टमध्येही सब-कॉम्‍पॅम्‍क्‍ट एसयूव्‍ही श्रेणीतील पंच बाजारात आणून ही स्पर्धेत चुरस वाढवली आहे. पंच समोरून हॅरिअर, पाठीमागून नेक्सॉनसारखी दिसते. ‘पंच’चा आतील भाग साधा परंतु तितकाच आकर्षक आणि स्मार्ट वाटतो. डिजिटल आणि अॅनालॉगचे मिश्रण असलेला स्पिडोमीटर, ७ इंची ‘हारमन’चा टचस्क्रिन ज्यात अँड्रॉइड-अॅपल कार प्ले, पूश स्टार्ट/स्टॉप, प्रोजेक्टर हेडलॅम्प (टॉप व्हेरिएंट), क्रूझ कंट्रोल, टाटाचे आय आरए कनेक्ट आदी फीचर्सही देण्यात आले आहेत. पंचच्या पुढील कुशनची रचना घरगुती खुर्चीप्रमाणे असल्याने लांबच्या प्रवासात थकवा जाणवण्याची शक्यता कमी आहे. मागील कुशन दोन व्यक्तींसाठी लांबच्या प्रवासासाठी आरामदायी ठरू शकते. तिसरा प्रवासी सडपातळ असेल, तर काहीच अडचण होणार नाही. कारची वातानुकूलन यंत्रणाही दमदार आहे.

चालकासाठी बटणावर मागे पुढे, तसेच उंचीनुसार खाली-वर होणारे कुशन देण्यात आले आहेत. त्यामुळे कार चालवताना दृष्यमानतेत कोणताही त्रास होत नाही. कारच्या पुढील दोन्ही कडा नजरेत येत असल्याने रस्त्यावर कमी-अधिक वेगात टिकून राहता येते. ‘पंच’चे खास वैशिष्ट्य म्हणजे ही कारही अल्ट्रोझ, हॅरिअरप्रमाणेच ‘अल्फा’ प्लँटफॉर्मवर बनवण्यात आली असून, या कारचे सर्व दरवाजे ९० अंशामध्ये उघडतात. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीला कारमध्ये चढताना किंवा उतरताना त्रास होत नाही. पंचमध्ये ३१९ लिटरचा बूटस्पेस मिळतो. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी जाताना पुरेसे सामान त्यात आरामात राहू शकते.

यामध्ये ईको आणि सिटी असे दोन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. कारला ० ते १०० किलोमीटर प्रतितास वेग पकडण्याला १६ ते १८ सेकंद लागतात, परंतु एकदा वेग पकडल्यानंतर लेन बदलताना किंवा वळण घेताना ती रस्ताही सोडत नाही. पंचच्या मॅन्‍युअल व ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनमध्ये तुलना करायची झाल्यास महामार्ग, घाटरस्ते, खडबडीत रस्त्यांवर मॅन्‍युअल गिअर बॉक्स तुलनेने सरस ठरतो. शहरी रस्त्यांसाठी ऑटोमेटिक उपयुक्त ठरू शकते. ही कार ठराविक वेग मर्यादेत चालवल्यास १५ ते १८ किलोमीटर प्रतिलिटरचा मायलेज देऊ शकते. पंचमध्ये ७ रंगांचे पर्याय देण्यात आले आहेत.

पंच आणि स्पर्धेतील कार

कार प्रारंभी किंमत (एक्स शोरूम)

पंच ५ लाख ४९ हजार

कायगर ५ लाख ६४ हजार

मॅग्नाईट ५ लाख ७१ हजार

पंचची सुरक्षा...

प्रौढ व्‍यक्‍तींच्‍या संरक्षणासाठी पंचला प्रतिष्ठित ग्‍लोबल एनसीएपी ५-स्‍टार रेटिंग (१६.४५३), तर लहान मुलांच्‍या संरक्षणासाठी ४-स्‍टार रेटिंग (४०.८९१) मिळाले आहे.

टाटाच्या एजाईल लाइट फ्लेक्सिबल अँडव्हान्‍स (अल्फा) आर्किटेक्‍चरवर पंचची निर्मिती करण्यात आली असल्याने या कारला विशेष मजबुती प्राप्त झाली आहे

.

ऑटेमेटिक हेडलँप, रेन सेन्सिंग वायपर्स, २ एअर बॅग्ज, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टिम+ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, आयएसओफिक्सचे कुशन रिअर पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा आदी सुरक्षात्मक बाबी दिल्या आहेत.

इंजिन, किंमत आणि व्हेरिएंट

पंचमध्ये ५ स्पीड मॅन्‍युअल/एएमटी गिअरबॉक्स, ११९९ सीसी, ३ सिलिंडर, १.२ लिटर पेट्रोल इंजिन, ८५ बीएच ताकद दिली असून ११३ एनएम टॉर्क ही कार निर्माण करते.

प्‍युअर, अॅडव्हेन्‍चर, अकॉम्‍प्‍लिश व क्रिएटिव्ह असे चार व्हेरिएंट पंचमध्ये दिले आहेत, ज्यांची दिल्ली एक्स शोरूम किंमत अनुक्रमे ५ लाख ४९ हजार, ६ लाख ३९ हजार, ७ लाख २९ हजार, ८ लाख ४९ हजार ठेवली आहे.

टाटाने पंचचे प्रत्येक व्हेरिएंट मानवी वैशिष्ट्यांना अनुसरून बाजारात आणले आहेत. यामध्ये शेवटची म्हणजेच क्रिएटिव्ह व्हेरिएंट तंत्रज्ञानप्रेमींसाठी खास डिझाइन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.