झूम - तरुणाईसाठी यामाहा ‘एमटी १५’

‘एमटी १५’च्या सीटवर बसून तिचे हँडल पकडल्यानंतर आणि गाडी चालवण्यास सुरुवात
यामाहा
यामाहा sakal
Updated on

भारतात पारंपरिक दुचाकी म्हटल्यावर वर्तुळाकार किंवा चौकोनी हेडलाईट, सरळ लांबलचक सीट, साधी रचना किंवा डिझाईन आणि अशा दुचाकीवरून ठराविक वेग मर्यादेत होणारा प्रवास, हे सर्वसामान्य चित्र. याच्या नेमके उलटे चित्र हल्ली दुचाकी बाजारात दिसते. स्पोर्टिव्ह लुक असणाऱ्या दुचाकी बाजारात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यामाहा कंपनीने ‘एफ झेड’च्या धर्तीवर लाँच केलेली ‘एमटी १५’ ही दुचाकीही तिच्या आकर्षक दिसण्याने मोहून टाकते. समोरून हेडलाईटची रचना, टेलिस्कोपिकऐवजी दिलेले ‘यूएसडी फोर्क’ अर्थात सस्पेन्शन, आरामदायी आसन व्यवस्था हे तिची वैशिष्ट्ये. ‘एमटी १५’च्या राईडचा हा लेखाजोखा...

यामाहाने ‘एमटी १५’ ही सर्वप्रथम मार्च २०१९मध्ये भारतात लाँच केली. तर, ‘एमटी १५’चे व्हर्जन २ एप्रिल २०२२मध्ये दाखल झाले. पूर्वीच्या तुलनेत काही बदल आणि किमतीतही वाढ करण्यात आली आहे. यात ‘मास्टर ऑफ टॉर्क’चे संक्षिप्त रूप,

म्हणजेच ''एमटी''. नावाप्रमाणेच ‘एमटी १५ व्हर्जन २’ पॉवरफूल वाटली. ६ स्पीड, १५५ सीसी, लिक्विड कूल, ४ स्ट्रोक, एसओएचसी ४ वॉल्व्ह

इंजिन या दुचाकीत दिले आहे. त्यात १८.५ पीएस पॉवर दिली असून, ही दुचाकी ८५०० आरपीएमला १३.९ एनएम टॉर्क निर्माण करते. ‘एमटी १५’चे स्टँडर्ड आणि मोटो जीपी असे दोन व्हेरिएंट असून, तिची दिल्ली एक्स शोरूम किंमत १ लाख ६४ हजार इतकी आहे.

‘एमटी १५’च्या सीटवर बसून तिचे हँडल पकडल्यानंतर आणि गाडी चालवण्यास सुरुवात केल्यानंतर गाडी कितीही वेळ चालवा, आरामदायी प्रवासाची खात्री मिळते. हा आरामदायीपणा क्वचितच एका स्पोर्ट्स बाईकमध्ये मिळतो. पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशाला प्रवासात आराम मिळण्याची शक्यता कमी वाटते. कारण सिटची लांबी कमी असल्याने चालकाला चिटकून बसण्याशिवाय पर्याय राहत नाही. कदाचित स्पोर्टिव्ह लुकमुळे सिटची लांबी कमी दिली असल्याने याकडे थोडेफार दुर्लक्ष करता येऊ शकते. गाडीचे हँडल बार पकडल्यानंतर हाताची स्थिती किंवा पायांची ठेवण याकडे यामाहने कटाक्षाने लक्ष दिलेले आहे. सर्वसामान्य दुचाकींपेक्षा ‘एमटी १५’वर बसल्यानंतर निश्चितच वेगळा फील येतो.

सौम्य इंजिन

‘एमटी १५’ची रस्त्यावरील कामगिरीही तुलनेने चांगली वाटली. गाडी स्टार्ट केल्यानंतर स्मूथ आवाजाचे इंजिन प्रत्यक्ष रस्त्यावर गाडी वेगात पळवताना पूर्ण ताकद देते. विशेष म्हणजे, गाडी कितीही वेगात नेली तरी इंजिनचा आवाज कायम कमीच राहतो. ६ स्पीड गिअरबॉक्स असल्याने अगदी सहाव्या गिअरलाही गाडी अपेक्षित पिकअप घेते. सुरुवातीला तत्काळ एक्सलरेशन दिल्यानंतर ‘यामाहा स्टाइल जो पिकअप अपेक्षित असतो, तो मिळत नाही. गाडी थोडे जर्क घेते. मात्र, नंतर वेग पकडताच इंजिनच्या ताकदीचा अंदाज येतो. गाडीचे इंजिन खूपच सौम्य आहे. त्यामुळे ताशी १०० ते १२०चा वेग पकडला, तरी गाडीला व्हायब्रेशन्स जाणवले नाही.

टिपिकल यामाहा स्टाइल

‘एमटी १५’च्या खऱ्या राईडचा आनंद महामार्गावर घेता येतो. कितीही वेगात असली तरी नियंत्रित होते, वळणावर रस्त्यावरील पकड मजबूतच राहते. टायरच्या जाडीमुळे अतिवेगातही तीव्र वळणही सहज पार होते. एकूणच इंजिनच्या कामगिरीत टिपिकल ''यामाहा स्टाइल'' कायम राखते. मायलेजही ४० ते ४५ किलोमीटर प्रतिलिटर देते व तरुणाईचे स्पोर्ट्स बाईक चालवण्याचे स्वप्नही पूर्ण करते.

‘एमटी १५’चे फीचर्स

ऑटोमेटिक हेडलाईट, डीआरएल (डे टाइम रनिंग लाईट), डिजिटल फ्युएल गेज, इंजिन किल स्वीच, मोबाईल कनेक्टिव्हिटी, वाय कनेक्ट, डिजिटल ऑडोमीटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, स्टँड अलार्म, सिंगल चॅनेल एबीएस, वेट-मल्टिपल डिस्क क्लच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.